लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : पांढरकवडा तालुक्यात मानव व प्राण्यांची शिकार करून धुमाकूळ घालणाºया वाघिणीला वन विभागाने पकडण्यात यश मिळविले. त्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याच्या बाहेर इतर वाघांचा मुक्त संचार असल्याने त्यांच्यापासून गावकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या फिरणाऱ्या वाघांनाही जेरबंद करावे यासाठी बुधवारी गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना साकडे घातले.पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली. या वाघिणीला शोधण्यासाठी जंगलात वन विभागाने तब्बल २७ ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात ती कैद झाली आणि पकडली गेली. वृद्धेची शिकार केल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात या वाघिणीला जीवंत पकडण्यात वन खात्याला यश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड, आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याच्या कामगिरीचे कौतुक केले.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्लेखोर वाघिणीसह अनेक वाघांचा मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या सर्वच वाघांना वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी बुधवारी पांढरकवडा वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक एस.आर.दुमोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुभाष कायतवार यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या दहशतीमुळे शेतीकाम ठप्प पडले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, मजुरीची कामे ठप्प पडली असून मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.बुधवारी पकडल्या गेलेल्या वाघिणीची नागपूर येथील अस्थाई उपचार केंद्रात रवानगी करण्यात आली. ही नरभक्षक गावात जाऊ नये म्हणून सात किलोमीटर क्षेत्राला चेनलिंग फेन्सींग करण्यात आले होते.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्ले करित असलेल्या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश २१ सप्टेंबरला प्राप्त झाले. त्यानुसार युद्धपातळीवर हल्लेखोर वाघिणीचा शोध घेऊन तिला पकडण्यात आले आहे. यामुळे तूर्तास वाघ-मानव संघर्षाला पुर्णविराम मिळाला आहे.- एस.आर.दुमोरेउपवनसंरक्षक, पांढरकवडा
नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST
पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली.
नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा
ठळक मुद्देगावकऱ्यांचे साकडे : २७ ट्रॅप कॅमेरांनी टिपले