शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मोक्याच्या जागा काबीज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:55 IST

प्रस्थापित व्यवस्था ही सहजासहजी न्याय देत नाही. न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम घेऊन मोक्याच्या जागा काबीज कराव्या, असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.

ठळक मुद्देदशरथ मडावी : अमरावती विभागीय बिरसा अभिवादन परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रस्थापित व्यवस्था ही सहजासहजी न्याय देत नाही. न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम घेऊन मोक्याच्या जागा काबीज कराव्या, असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.येथे पार पडलेल्या अमरावती विभागीय बिरसा अभिवादन परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात हा कार्यक्रम पार पडला. विचार मंचावर उद्घाटक प्रा. डॉ. अशोक राणा, महासचिव प्रमोद घोडाम, राज्य उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, उत्तम कनाके, प्रा. डॉ. हरिष धुर्वे, अमरावती जिल्हाध्यक्ष मारोती उईके, अकोला जिल्हाध्यक्ष राजेश मस्के, वाशिम जिल्हाध्यक्ष संतोष ठाकरे, राज्य संघटक वसंत कनाके उपस्थित होते.विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना शाळा, महाविद्यालय, कार्यालयात जातीयवादाचे चटके लागल्यास, स्वत:चे मनोबल खच्ची करुन स्वत:ला संपवू नका. संघर्ष करा. गरज पडल्यास एकदा तरी मदतीसाठी बिरसा क्रांती दलाला आवाज द्या, असे आवाहन महासचिव प्रमोद घोडाम यांनी केले. यावेळी जागतिक पातळीवर संशोधन सादर करणारे दाते महाविद्यालयातील प्रा. डॉ. हरिष धुर्वे, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पल्लवी उमरे यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, नीट परीक्षा, इयत्ता दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक प्रा. कैलास बोके, सूत्रसंचालन संजय मडावी यांनी केले. तर आभार शिवनारायण भोरकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल कोवे, गणेश फुपरे, अतुल कोवे, शरद चांदेकर, रमेश मडावी, प्रवीण कंगाले, रवी आत्राम यांनी परिश्रम घेतले.