शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षी वाघिणीचा २५ दिवसांपासून गुंगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:39 IST

पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही.

ठळक मुद्देपगमार्क आढळले : शूटर नवाबला पुन्हा बोलावण्यासाठी हालचाली सुरू

योगेश पडोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही. दरम्यान, शोधमोहिमेदरम्यान, राळेगाव तालुक्यातील विस्तीर्ण जंगलात वाघिणीचे पगमार्क आढळले असून त्याआधारे मचानीवरून तिचा शोध घेतला जात आहे. वाघिणीचे लाईव्ह लोकेशन मिळत नसल्याने टी-१ मिशनवर तुर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राळेगाव तालुक्यातील सराटी जंगलात नरभक्षक वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी १२ सप्टेंबरपासून वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए.के. मिश्रा, सुनिल लिमये यांच्यासह प्रचंड मोठा फौजफाटा जंगलात तळ ठोकून आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने अनेक उपाययोजना केल्यात. परंतु, नरभक्षक वाघिणीचे लाईव्ह लोकेशन अद्यापही मिळाले नाही.राळेगावच्या विस्तीर्ण जंगलात असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात नरभक्षक वाघिणीचे पगमार्र कैद झाले आहेत. या पगमार्कच्या आधारे वाघिणीचा पाठलाग केला जात आहे. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी निर्माण करण्यात आल्या असून, त्यावरून वन कर्मचारी दुर्बिणीद्वारे वाघिणीचा शोध घेत आहेत.गत काही दिवसांपूर्वी टी-१ मिशनच्या यशस्वीतेसाठी मध्यप्रदेशातून चार तर ताडोबा येथून एक असे पाच हत्ती जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, ३ आॅक्टोबर रोजी ताडोबातून आणलेला हत्ती अचानक अनियंत्रीत झाला. त्याने चहांद व पोहणा येथे धुडगूस घातला. यात अर्चना कुळसंगे या महिलेचा बळी गेला, तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय गावातही मोठे नुकसान झाले. अखेर वन विभागाने नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तीला राष्ट्रीय महामार्गावर जेरबंद केले. त्यानंतर हे पाचही हत्ती परत पाठविले आहे. यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त अशी मोहिम चालवण्यात आली. मात्र असे असताना वन्यजीव विभागाला कोणतेही यश मिळाले नाही. वाघिणीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे असल्यामुळे पुन्हा हैद्राबाद येथून शुटर नवाबला बोलाविण्याचा हालचाली सुरू वनवर्तुळात सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.वाघिणीला शोधण्यासाठी मचाणीचा आधार१४ जणांचे बळी घेणाºया वाघिणीला जेरबंद करण्यासाठी राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात वन्यजीव विभाग तळ ठोकून आहे. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान २५ दिवसांच्या कालावधीत तिचे लाईव्ह लोकेशन मिळाले नाही. त्यामुळे आता मचानीचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी जंगलात मचानीवरून अद्ययावत दुर्बिणीद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ