शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक ‘अवनी’ला नाईलाजाने ठार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:02 IST

आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देशृूटर नवाबची स्पष्टोक्ती : गावकऱ्यांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शुटर (हंटर) नवाब शहाफत अली खान यांनी दिली.राळेगाव-पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त सावरखेड, वरध, वेडशी, खैरगाव, बोराटी, सराटी, लोणी, बंदर, तेजनी, विहीरगाव, वाढोणाबाजार व परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री सावरखेड येथे नवाब व त्यांच्या मुलाचा आणि इतर दोघांचा जाहीर सत्कार घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवाबने उपरोक्त भूमिका मांडली.सोशल मीडिआ, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघिणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघिणग्रस्त परिसरातील ग्रामस्थांनी हा जाहीर सत्कार केला. सुमारे वर्षभर वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी दिल्यानंतर अवनीला ठार मारण्यात यश आले. याच नरभक्षक वाघिणीने १३ शेतकरी, मजुरांचे बळी घेतले. वाघिण ठार झाल्याने परिसरातील जनता आनंदी झाली. खैरगाव कासार येथील स्वाती ठाकरे यांनी वाघिण ठार झाल्यामुळे जनता मोकळा श्वास घेऊ लागली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.ग्रामस्थांनी शहाफत अली खान, अजगर अली खान व दोघांचा शाल, श्रीफळ व वाघिणीचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला. यावेळी अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे आदींनी मत मांडले. अवनीच्या मृत्यूवरून राजकीय पक्षांनी, नेत्यांनी राजकारण करू नये, असे त्यांनी ठणकावले. प्राण्यांच्या जीवापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा असून वन्यप्राणीमित्रांनी वाघग्रस्त भागातील लोकांच्या भावना जाणून घ्यावा, असे आवाहनही केले. आभार वेडशीचे सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी मानले.शेवटपर्यंत अवनीला वाचविण्याचा प्रयत्नसत्काराला उत्तर देताना शूटर शहाफत अली खान यांनी मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. सुरुवातील ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणYavatmalयवतमाळ