शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

यवतमाळात सर्वाधिक खर्च काँग्रेस उमेदवाराचा

By admin | Updated: October 18, 2014 02:02 IST

विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात सर्वाधिक खर्च काँग्रेस उमेदवाराचा झाला असून अपक्ष मात्र खर्चात मागे पडले आहे.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात सर्वाधिक खर्च काँग्रेस उमेदवाराचा झाला असून अपक्ष मात्र खर्चात मागे पडले आहे. २२ उमेदवारांपैकी २१ जणांनी निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिली होती. २८ लाखांच्या आत उमेदवाराने खर्च करावा, असा दंडक होता. मात्र बहुतांश उमेदवारांनी त्यापेक्षाही अर्ध्या रकमेतच निवडणूक लढविल्याचे अहवाल सादर केले आहे. कोट्यवधीचे उड्डान घेणाऱ्या उमेदवारांनी खर्च मात्र दहा लाखांच्या आसपासच दाखविल्याचे दिसत आहे. पक्षीय उमेदवारांचा खर्च पाच लाखांच्या घरात तर अपक्ष उमेदवारांचा खर्च हजाराच्या आकड्यातच झाल्याचे दिसते. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक उमेदवाराला दर २४ तासाला खर्चाचा हिशेब सादर करण्याचे निवडणूक विभागाने आदेश दिले. त्यानुसार बहुतांश उमेदवारांनी १२ ते १३ आॅक्टोबरपर्यंत निवडणूक खर्च सादर केला. इतर चार दिवसांचा खर्च त्यांनी अद्यापही खर्च सादर केला नाही. त्यामुळे २२ पैकी २१ उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक खर्च काँग्रेसचे उमेदवार राहुल ठाकरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १२ आॅक्टोबरपर्यंतचा हिेशेब सादर केला. त्यानुसार त्यांनी दहा लाख १५ हजार ८७१ रुपये खर्च केल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बाजोरिया यांनी ११ आॅक्टोबरपर्यंतचा खर्च सादर केला असून त्यांनी सात लाख ४७ हजार ९८८ खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे. भाजपा उमेदवार मदन येरावार यांनी १३ आॅक्टोबरपर्यंत खर्चाचा अहवाल सादर केला असून आठ लाख ८८ हजार १४९ रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. बसपाचे उमेदवार मो.तारीक मो. शमी लोखंडवाला यांनी १२ आॅक्टोबरपर्यंतच्या खर्चाचे विवरण सादर केले असून सात लाख ३४ हजार १४३ रुपये निवडणुकीत खर्च केले आहे. शिवसेना उमेदवार संतोष ढवळे यांनीही १२ आॅक्टोबरपर्यंतचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला असून चार लाख २३ हजार ६६५ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. अपक्ष प्रदीप वादाफळे यांनी १३ आॅक्टोबरपर्यंत सहा लाख १० हजार ६५२ रुपये, मनसे उमेदवार भानुदास राजने यांनी एक लाख ४८ हजार रुपये, अपक्ष रवींद्र देशमुख यांनी तीन लाख ५६ हजार ४४०, हिरालाल गायकवाड ३८ हजार ८८२, दिलीप मुक्कावार एक लाख ३२ हजार ५२५, पुरुषोत्तम भजगवरे २२ हजार ४६०, अशोक शेंडे ६५ हजार ११०, सोपान कांबळे २६ हजार २४६, वासुदेव कोकाटे २१ हजार ३९५, अ‍ॅड. चंद्रशेखर देशमुख १६ हजार ५००, मनीष ढाले ११ हजार ६००, प्रशांत राठोड १० हजार ५७४, राहुल अशोकराव ठाकरे दहा हजार २९० रुपये, वसंत कनाके २३ हजार २१० आणि ज्ञानेश्वर राठोड यांनी १६ हजार १० रुपयांचा खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे. (शहर वार्ताहर)