शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:29 IST

हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.

ठळक मुद्देजन्मगावातून जयंतीदिनी प्रारंभ : कोट्यवधी स्वाक्षऱ्या घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.याबाबत शनिवारी यवतमाळात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांनी तातडीने बैठक घेऊन या मोहिमेची आखणी केली. ‘हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक भारतरत्न पुरस्कार अभियान समिती’ स्थापन करण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात ही सर्वसमावेशक समिती पोहोचून प्रत्येक गावातून स्वाक्षºया गोळा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.माजी खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी ‘फसव्या कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलनात वसंतराव नाईकांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली होती. तोच धागा धरून शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वामनराव कासावार यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. टी. सी. राठोड, माजी आमदार विजयाताई धोटे, डॉ. रमाकांत कोलते, देवानंद पवार, माधव सरकुंडे, अ‍ॅड. मिनाज मलनस, अ‍ॅड. जयसिंह चौहान, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, मनिष पाटील, ्नराजेंद्र हेंडवे, जयानंद खडसे, हरिश राठोड, हेमंत कांबळे, धनंजय मानकर, बाबूसिंग कडेल, वसंत जाधव, हरिविजय राठोड, अ‍ॅड. आर. एच. घरडे आदी उपस्थित होते.या मोहिमेत सर्वपक्षीय आजी, माजी आमदार, खासदार, मंत्री यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. गहुली ते दिल्ली अशी ही मोहीम ५ डिसेंबरला संपवून कोट्यवधी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाकडून स्वाक्षरी घेण्यासाठी माजी खासदार नाना पटोले संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक