शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

शिबिराने दिला दोस्तीचा ‘हात’

By admin | Updated: November 23, 2015 02:11 IST

गणपत आणि मधुकर. कृत्रिम अवयव बसवून घेण्यासाठी ते दोघेही आजूबाजूला बसले होते. गणपतला हात बसवून घेण्यासाठी शर्ट काढायचा होता, पण जमत नव्हते.

शिबिराचे फलित : माजी सरपंच आणि निवृत्त मुख्याध्यापकाची अनोखी भेटयवतमाळ : गणपत आणि मधुकर. कृत्रिम अवयव बसवून घेण्यासाठी ते दोघेही आजूबाजूला बसले होते. गणपतला हात बसवून घेण्यासाठी शर्ट काढायचा होता, पण जमत नव्हते. शेवटी बाजूलाच बसलेल्या मधुकरने स्वत:चे दोन्ही हात वापरून गणपतचा शर्ट काढून दिला. पण शर्ट काढता-काढता दोघांनीही एकमेकांचे चेहरे न्याहाळले अन् चकीत झाले. काही वर्षांपूर्वी घट्ट मैत्री असलेले ते दोघे बऱ्याच कालावधीनंतर आज अचानक जवळ आले होते. अपंगत्वाच्या जखमा बाजूला ठेवून हास्यकल्लोळात बुडूनही गेले.वयाची साठी ओलांडलेल्या दोघांच्याही मनात आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू झाला. गणपतराव भोंगाडे हे १९८८ मध्ये वटबोरी गावाचे सरपंच होते. अन् त्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेत मधुकर गहूकार मुख्याध्यापक होते. दोघांचाही स्वभाव विनोदी. साहजिकच गट्टी जमली होती. पण काळ पुढे सरकला. गणपतरावचे सरपंचपदही गेले आणि मधुकररावही यवतमाळला राहायला गेले. गाठीभेटी संपल्या. काही काळाने एकमेकांचे एकमेकांना विस्मरणही झाले. पण काळाने पुन्हा त्यांना आज एकमेकांच्या आजूबाजूला आणून बसविले. एकमेकांची मदत करताना ‘‘अरे मायापेक्षा म्हतारा झाला राज्या तू!’’ असे मिश्किल वाक्य उमटले. दोघेही खळखळून हसले. तेव्हा पुन्हा एक विनोदी उद्गार उमटला, ‘‘आगा अर्धे दातं तं गायब बी झाले!’’ पुन्हा खसखस पिकली. जुनी ओळख ताजी झाली होती. सुख-दु:खाचे वाटप सुरू झाले. मधुकर गहूकार म्हणाले, २००२ मध्ये रस्ता ओलांडत असताना काळीपिवळीने उडविले. एक पाय कटला. आता कृत्रिम पाय भेटला. तेवढंच सुख. गणपतरावची कहाणी मात्र फारच वेगळी. ते म्हणाले, बिमारीमध्ये हात कापावा लागला. पण मेहनत आजही चालूच आहे. दुध डेअरीवर दूध पोहोचवावे लागते. एक हात नसला तरी ८० लिटर दुधाच्या कॅटल्या बांधून सायकल चालवतो. आता दुसरा हातही भेटला तं काही पाहायचं कामच नाही!या दोन जुन्या मित्रांना शिबिरात हात-पाय मिळाले. जुन्या आठवणीही मिळाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उतरत्या वयात तारुण्यातला उत्साह मिळाला.