शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सीएए कायद्यामुळे गरिबांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : आर्णी येथे मार्गदर्शन, शाहीन बाग धर्तीवरील आंदोलनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमुळे देशातील गरीब वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरुद्ध सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाचे आता धगधगत्या विचारधारेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले.आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे. हे सर्व नागरिक आता नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता धडपड करीत आहेत. यात त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धात लढलेले सैनिक, आसामचे मुख्यमंत्री, चंद्रयान-२ चे मुख्य सल्लागार अशा अनेकांच्या कुटुंबियांचा वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांना नागरिकत्व सिद्ध करताना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.या कायद्यामुळे वेळीच सजग होवून दिल्लीत १२ महिलांनी शाहीन बाग येथे धरणे आंदोलन सुरू केले. ते आंदोलन आता देशभर पसरले आहे. ती एक विचारधारा म्हणून देशात रूजत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या कायद्यांचा फेरविचार करावा, असे आवाहन अब्दूर रहेमान यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी