शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

बस उलटून ३० विद्यार्थी जखमी

By admin | Updated: August 2, 2016 01:31 IST

रस्त्यावरील गुरे चुकवून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात ३०

राळेगाव : रस्त्यावरील गुरे चुकवून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात ३० विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास राळेगावजवळ घडली. अपघातातील नऊ गंभीर जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. राळेगाव-कापसी-राळेगाव या राळेगाव आगाराच्या एमएच ४० वाय ५३३८ क्रमांकाच्या बसला हा अपघात झाला. ही बसफेरी राळेगाव येथे शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोडली जाते. सोमवारी सकाळी कापसी ते राळेगाव मार्गावर असलेल्या विविध गावांमधील विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन राळेगावकडे येत होती. यामध्ये विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी होते. दरम्यान, गुरे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चिखल असल्याने उलटली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळून जखमी झाले. बसच्या मुख्य प्रवेशव्दारातून प्रवासी बाहेर पडले. या घटनेत स्रेहा भोंग, पीयूष डोंगरे, निकीता लोणारे, श्याम डोंगरे, संकेत पारिसे, अरुणा खडसे, गजानन राऊत, निकीता पिसे, पूजा आडे या विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच प्रतीक्षा नागपुरे, दीक्षा राजकोल्हे, साक्षी कुकरे, मनोज निमसरकर, संस्कृती मानकर, भूमी गोटे, कोमल डोंगरे, प्रगती नान्ने, प्रिया उमाळे, साक्षी तेलंग, वैशाली नागपुरे, स्वाती वानखेडे, संविधान धनवीज, करिष्मा कापटे, महिमा परचाके, विकास कापटे, अनिता खुराना, किसन खोडेकर, दीक्षा गोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. या घटनेप्रकरणी चालक एस.पी. किन्नाके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. बस उलटल्याची माहिती मिळताच कापसी, रामतीर्थ, वालदूर, कळमनेर येथील पालक, स्थानिक शाळांचे शिक्षक आदींची रुग्णालयात गर्दी झाली होती. घटनास्थळाला पोलीस दाखल झाले. पोलीस निरीक्षक अरूण आगे, उपनिरीक्षक अशोक सोळंकी यांनी घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)