शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:08 IST

चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.

ठळक मुद्दे आधी एबी पॉझिटीव्ह, नंतर ओ : जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.पुसद तालुक्याच्या बोरी(खु) येथील नितीन सीताराम जाधव यांनी त्यांच्या मुलाची रक्तगट तपासणी डॉ. राजेश अग्रवाल यांच्या सत्यशांती पॅथोलॉजी लॅबमध्ये केली होती. त्यावेळी त्यांना मुलाचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असा सांगितला. तसे प्रमाणपत्रही दिले होते. पाच महिन्यानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांना मुलाला रक्ताची गरज असल्याचे सांगितले. पुसदमध्ये या गटाचे रक्त उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नागपूर येथून एबी पॉझिटिव्ह रक्त बोलाविले.नागपूर येथून बोलाविलेले रक्त आणि मुलाचे रक्त यात फरक आढळला. तेव्हा मुलाचा रक्तगट ओ असल्याचे स्पष्ट झाले. सत्यशांती लॅबने दिलेल्या प्रमाणपत्राविरूद्ध नितीन जाधव यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. लॅब आणि न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती सत्यशांती लॅबने सदोष सेवा दिल्याच्या निर्णयाप्रत मंच पोहोचले. लॅब आणि अ‍ॅशुरन्स कंपनीने जाधव यांना आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ६० हजार रुपये व तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे.रक्तगटात फरकाची शक्यतासदर प्रकरणात सत्यशांती लॅबने आपली बाजू मांडताना पेशंटच्या रक्तातील कोल्ड अ‍ॅटो अँटीबॉडीजमुळे रक्तगटात फरक येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. नवजात बाळाचे ए, बी, ओ अँटीजन्स हे पूर्णत: डेव्हलप झालेले नसतात. नवजात बाळाची प्रतिकारशक्ती वाढत्या वयानुसार वाढत जाते. काही प्रकरणात रक्तगट बदलू शकतो, अशी बाजू मांडण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयPathology Labपॅथॉलॉजी लॅब