शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: July 15, 2015 03:02 IST

लहान मुलांच्या भांडणावरून वाद होऊन दोन गटांत लाठी काठी व लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली.

मुलांच्या भांडणातून वाद : २२ जणांवर गंभीर गुन्हे दाखलपुसद : लहान मुलांच्या भांडणावरून वाद होऊन दोन गटांत लाठी काठी व लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील पाच ते सहा जण जखमी झाले. तर दोन्हीकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसद परिसरात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून देण्यात आल्या असून दोन्हीकडील तब्बल २२ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.फिर्यादी लक्ष्मी राजू कवडे (३७ रा. नवीन पुसद) यांच्या लहान मुलासोबत दुसऱ्या गटातील (आंबेडकर वॉर्ड) लहान मुलाचे भांडण झाले. या किरकोळ घटनेनंतर फिर्यादी लक्ष्मी कवडे यांच्या घरी आलेला पाहुणा पिंटू श्रीरामे हा चौकातील दुकानात पुडी खाण्याकरिता गेला असता आरोपी दौलत हाडसे, भीमा तुकाराम हाटे, छोटू तुकाराम हाटे, आकाश सावळे, अमोल सावळे, मुन्ना हाटे (सर्व रा. आंबेडकर वॉर्ड पुसद) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पिंटू श्रीरामे व रवी दिंडे यांना लाभा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच रवी दिंडे यास जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मी राजू कवडे यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तर याच प्रकरणात फिर्यादी आकाश सुधाकर सावळे (२६ रा. आंबेडकर वॉर्ड पुसद) हा मित्रासोबत हनुमान मंदिराच्या ओट्यावर बसले असता आरोपी राजू कवडे, त्याचा भाचा पिंटू श्रीरामे, देवीदास शिंदे, धनंजय पांढरे, विनोद कवडे, गणेश शिंदे, मारोती शिंदे, लल्ला दिंडे, प्रमोद दिंडे, रमेश लोंढे, महेश बेरगड, गजानन शिंदे, विनोद शिंदे, अमोल पांढरे, दिनेश पांढरे, आकाश शिंदे (सर्व रा. नवीन पुसद) आदींनी जातीवाचक शिवीगाळ करून लाठी काठीने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी आकाश सावळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सर्व १६ आरोपींविरुद्ध विविध कलमांसह अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले. घटनेच्या वेळी दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पुसद शहरचे ठाणेदार धनंजय जगदाळे, एपीआय धीरज चव्हाण, एपीआय क्षीरसागर हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गटांतील नागरिकांना शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसद या दोन्ही परिसरात प्रचंड तणाव होता. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. आज दारव्हा येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (प्रतिनिधी) दगडफेकीने वाढला तणावलहान मुलांच्या भांडणातून आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसदमधील काही नागरिकांचा वाद पेटला. वाद सुरू असताना दोन्हीकडून दगडफेक करण्यात आल्याने तणाव आणखी वाढला. त्यामुळेच दंगल आणि अ‍ॅट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे या प्रकरणात दाखल करण्यात आले.