शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:56 IST

परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही.

- विलास गावंडेयवतमाळ  - परदेशात पर्यटनासाठी जाणा-या नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. कंपनीने त्यांना भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे व सदस्य सुहास आळशी यांच्या उपस्थितीत सदर प्रकरणाचे कामकाज चालले.पुसद येथील आशीष रमेश बजाज व अंकिता आशीष बजाज या नवदाम्पत्याने परदेशात पर्यटनासाठी थॉमसकूक इंडिया लि. या कंपनीकडे बुकिंग केली. सुपर बजेट अंतर्गत लंडन, पॅरिस, बेल्जीयम, स्वित्झरलँड या देशात फिरण्याची संधी मिळणार होती. मात्र कंपनीने ही सहल रद्द केली. तसे बजाज यांना कळविले. युरोपीयन वंडर ही परदेशी सहल जात असल्याचे त्यांना सांगितले.यासाठी त्यांनी संमती दिली. आवश्यक त्या सर्व रकमा बजाज यांनी थॉमसकूक कंपनीकडे टप्प्या टप्प्याने जमा केल्या.सहल कंपनीची मुजोरीसहल केव्हा निघणार याची कंपनीकडे विचारणा सुरू असतानाच बजाज यांचा व्हिसा रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे या दाम्पत्याचे विदेशवारीचे स्वप्न अपूर्ण राहिले. व्हिसा काढण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्र आणि माहिती दिल्यानंतरही रद्द का करण्यात आला याची माहिती थॉमसकूक कंपनीकडून दिली जात नव्हती. कंपनीने व्हिसाकरिता अपूर्ण कागदपत्र सादर केले. शिवाय माहितीही चुकीची नोंदविण्यात आली. त्यामुळे बजाज यांचा व्हिसा रद्द झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार झाल्यानंतरही कंपनीने त्यांना भरलेले संपूर्ण दोन लाख ७० हजार २७५ रुपये परत मिळणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने सहल शुल्काच्या नावाखाली एक लाख ६१ हजार १६० रुपये कपात केले.कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपकाकपात केलेली रक्कम परत मिळावी, तसेच शारीरिक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च मिळावा याकरिता बजाज यांनी थॉमसकूक कंपनीकडे मागणी केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे सुरू झाली. अखेर त्यांनी न्यायासाठी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात तक्रार दाखल केली. दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती मंचाने थॉमसकूक कंपनीविरोधात निकाल दिला. बजाज यांना त्यांची कपात केलेली रक्कम एक लाख ६१ हजार १६० रुपये सव्याज द्यावी, मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी २५ हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे. थॉमसकूक कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच बजाज यांची परदेश सहल रद्द झाली, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळ