शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने बैलबाजार पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:37 IST

दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

ठळक मुद्देभाव अर्ध्यावर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी आले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शेतकऱ्यांऐवजी थेट मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारीच यवतमाळात येऊन चक्क अर्ध्या किमतीत बैलजोड्या विकत घेत आहेत.खरीप हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांच्या हाती पैसे आले नाही. शेतकऱ्यांनी उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावला. यातून सुटका व्हावी म्हणून शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीला आली आहे. त्या तुलनेत खरेदी करणारे मात्र बाजारात नाही. यामुळे बैलबाजार कोसळला आहे.बैलांची खरेदी करणारे व्यापारी आणि दलालच बाजारात दिसत आहे. ही मंडळी बैलाची अत्यल्प दरात मागणी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व्यापारी जिल्ह्यात येऊन बैलांची खरेदी करताना दिसत आहे. अडत्यामार्फत खरेदी केली जात आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. ५० ते ६० हजार रूपयापर्यंत असलेली बैलजोडी ३० ते ३५ हजारापर्यंत मागितली जात आहे. यामुळे शेतकरी या बाजारातून दुसऱ्या बाजारात आणि तेथून आणखी तिसऱ्या बाजारात बैल घेऊन पायपीट करीत आहे. मात्र कुठेही भाव मिळत नाही.२०० पैकी १७० बैलजोड्या परतबैलबाजारात भाव नसल्याने शेतकरी बैल न विकता परत नेणेच पंसत करीत आहे. दुसऱ्या बाजाराकडे मोर्चा वळवत आहे. रविवारी यवतमाळच्या बैलबाजारात २०० जोड्यांपैकी केवळ ३० जोड्यांचीच विक्री झाली. त्याचा सर्वाधिक दर ३५ हजार रूपये राहिला. अपेक्षेपेक्षा हे दर निम्मे होते. शेतकऱ्यांना बैलजोडी ने-आण करण्याचाच मोठा खर्च करावा लागला.शेतकरी म्हणतात, पर्यायच नाहीउधारी, उसनवारी, सावकाराचे पैसे या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैलजोडी विक्रीचा निर्णय घेतला. पण आता पुढच्या वर्षी पाहू. यंदा भावच नाही.- अशोक मेश्राम, वाढोणा बाजारबैलजोडीला एक लाख रूपयाचा भाव ठेवला. बाजारात इतकी सुपर जोडी शोधून सापडत नाही. पण ५० हजारांच्या आताच मागत आहे. मी बैलजोडी न विकताच परत जाणार आहे. अडचणीत व्यापारी पाडून भाव मागत आहेत. - महादेव सोळंके, कळंबबैलजोडीला भाव नसले तरी दुधाळ जनावरांच्या किमती चांगल्या आहे. त्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. दुष्काळी स्थितीने बाजारात चढउतार होत आहे. मात्र पर्याय नसल्याने जनावरे विकावीच लागत आहे. - दत्ता पजगाडे, चाणी

टॅग्स :Marketबाजार