शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्यांवर बुलडोजर, श्रीमंतांवर मेहरनजर

By admin | Updated: March 21, 2017 00:03 IST

थील यवतमाळ-आर्णी मार्गाचे चौपदरीकरण करताना अतिक्रमण काढण्यात येत आहे.

वडगाववासी संतप्त : महिलांचा आक्रोश, नागरिक रस्त्यावर उतरले, वाहतूक ठप्प यवतमाळ : येथील यवतमाळ-आर्णी मार्गाचे चौपदरीकरण करताना अतिक्रमण काढण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमण काढताना केवळ झोपड्या हटविण्यात आल्या आणि श्रीमंतांच्या इमारती वाचविण्यात आल्या. यामुळे वडगावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सापत्न भूमिकेविरुद्ध संताप व्यक्त केला. सोमवारी येथे सायंकाळपर्यंत प्रचंड तणाव आणि गोंधळाची स्थिती होती.यवतमाळ-आर्णी मार्गावरील वडगाव ग्रामपंचायतीसमोरील अतिक्रमण काढण्यास सोमवारी प्रारंभ झाला. मोक्षधाम मार्गाकडून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. १३ मिटर ते २४ मिटरपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. यामध्ये ३० झोपड्या जमीनदोस्त झाल्या. ही मोहीम वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येताच अडखळली. या ठिकाणी ज्ञानेश्वर गुल्हाने यांची इमारत अतिक्रमणात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. रस्त्याच्या मार्किंगमध्ये हे उघडही झाले. परंतु, गुल्हाने यांनी या इमारतीचे अतिक्रमण हटविण्यावर ‘स्टे’ असल्याचे निवेदन बांधकाम विभागाकडे दिले. पण ही ‘स्टे आॅर्डर’ २०१२ ची असल्यामुळे त्याला अर्थ नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. ही इमारत पाडा अथवा आमच्या घराची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी लावून धरली.विकासकामात गरीब, श्रीमंत भेदभाव नको. अतिक्रमणाची कारवाई सर्वांवर समान व्हायला हवी. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक कांडूरवार यांनी हा नियम पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना समोरील कारवाई करण्यासाठी नागरिकांनी घेराव घातला. या भागातील महिलांनी साखळी करून वाहतूक रोखून धरली. संपूर्ण तिढा सोडविण्यासाठी पोेलीस उपअधीक्षक पीयूष जगताप या ठिकाणी आले. पोलिसांचा बंदोबस्त होता. कायदेशीर बाबी जाणून दुसऱ्या दिवशी या इमारतीपासूनच कारवाई करण्याचा प्रस्ताव नागरिकांपुढे ठेवण्यात आला. मात्र संतप्त जमाव मानण्यास तयार नव्हता. या तोडग्याकरिता वडगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू होती. कार्यालयाबाहेर प्रचंड तणाव होता. (शहर वार्ताहर)चार वेळा मोहीम थांबलीया भागात आतापर्यंत चार वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. झोपड्या पाडण्यात आल्या. मात्र, श्रीमंतांच्या इमारतीपासून कारवाई सोडण्यात आली. अद्यापही इमारतीची कायदेशीर बाजू समोर का आली नाही, याचा जाब नागरिकांनी विचारला आहे. सोमवारी मोहीम सुरू असताना या भागातील प्रतिष्ठितांसह अतिक्रमण हटविणारे व्यक्ती रस्त्यावर होते.