शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बुलडोझर चालला

By admin | Updated: January 3, 2015 23:08 IST

यवतमाळ शहराच्या चौफेर वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर शनिवारी प्रशासनाचा बुलडोजर चालला. पहिल्या दिवशी आर्णी मार्गावरील २२५ अतिक्रमण भूईसपाट करण्यात आले. तगड्या पोलीस

२२५ दुकाने भुईसपाट : पोलिसांचा तगडा बंदोबस्त यवतमाळ : यवतमाळ शहराच्या चौफेर वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर शनिवारी प्रशासनाचा बुलडोजर चालला. पहिल्या दिवशी आर्णी मार्गावरील २२५ अतिक्रमण भूईसपाट करण्यात आले. तगड्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेला अतिक्रमणधारकांनी सुरुवातीला विरोध केला. प्रशासनाचा फौजफाटा पाहून नंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. यवतमाळ नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, दूरसंचार विभाग आणि पोलीस खात्याच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम शहरात राबविण्यात आली. सकाळी ९ वाजता अतिक्रमण हटाव पथक आर्णी मार्गावर पोहोचले. वडगाव स्थित वडारवाडीपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अंतरापर्यंतचे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. यामध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानांवर प्राधान्याने कारवाई करण्यात आली. दोन बुलडोजरच्या मदतीने १२ मीटरच्या आत येणारे सर्व अतिक्रमण भूईसपाट करणे सुरू झाले. रस्त्याला लागून असलेले वसाहतीचे फलक आणि अनेक दुकानांचे छतही या मोहिमेत धारातिरथी पडले. अतिक्रमण हटाव पथक आर्णी मार्गावर पोहोचताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला या मोहिमेला काही दुकानदारांनी विरोध करून पाहिले. आम्ही आताच दुकाने हटवितो असे म्हणू लागले. मात्र महिनाभरापासून नोटीस देऊनही अतिक्रमण का हटविले नाही, असा सवाल करीत दुकानांवर बुलडोजरचा पंजा चालला. प्रशासनाची कडक भूमिका बघता त्यानंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढणे सुरू केले. बुलडोजर पोहोचण्यापूर्वी अनेक जण आपली दुकाने काढताना दिसत होते. काहींनी सायकल रिक्षावरून दुकाने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. आर्णी मार्गावर सकाळपासून पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी पहिल्या दिवशी २२५ दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. जप्त केलेले साहित्य नगरपरिषदेच्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून नेण्यात आले. मात्र अनेकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढल्याने नगरपरिषदेला साहित्य जप्त करण्याची वेळच आली नाही. सायंकाळी ४ वाजता आर्णी नाका परिसरात येऊन अतिक्रमण हटाव मोहीम थांबली. (शहर वार्ताहर)