शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात अतिक्रमणावर बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:45 IST

शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालिकेची धडक मोहीम : पोलीस बंदोबस्तात हटविले अवैध बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे.एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे. स्टेडियम रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्याने नेहमीच वाहतूूक सुरू असते. आखाडा परिसरात बेतवार ले-आऊट, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, मुलींचे शासकीय वसतिगृह व शाळा महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी, नागरिक जाण्यायेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब असल्यामुळे हा रस्ता अगोदरच अरूंद झाला आहे. त्यातल्या त्यातच या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी तर अवैध अतिक्रमण केले होते. काहींनी तेथे दुकानेसुद्धा थाटली होती. तसेच काही व्यावसायिकांनी तर दोन-तीन ठिकाणी टपºया टाकून आपली जागा आरक्षित केली होती. ही जागा दुसºयाला ३० ते ४० हजार रूपये महिन्याने किरायाने दिली होती. अतिक्रमण करून जागा बळकावण्याची व ती दुसºयाला भाड्याने द्यायची, हा प्रकार अतिक्रमण हटविताना उघडकीस आला. या रस्त्यावरील संपूर्ण अवैध अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे हा रस्ता आता रहदारीस मोकळा झाला आहे. त्यानंतर बसवेश्वर चौकापासून जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील व्यापार संकुलासमोर असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. बचत भवनासमोर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणे करण्यात आली होती. या अतिक्रमणामुळे बचत भवन परिसरात असलेल्या महात्मा गांधींचा पुतळाच दिसेनासा झाला होता. अतिक्रमणामुळे हा पुतळा पूर्णपणे झाकून गेला होता. पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविल्यामुळे ही जागा पूर्णपणे मोकळी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.व्यावसायिकांकडून सहकार्याची अपेक्षाशासनाच्या आदेशानुसार शहरातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू असून रस्त्यावर किंवा फुटपाथवर अतिक्रमण केलेल्यांचीच दुकाने हटविण्यात येणार आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे व रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी केले आहे.