शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बैलबाजारावर संक्रांत

By admin | Updated: January 4, 2016 04:40 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे

दुष्काळाने दर पडले : महिना लोटला तरी ग्राहक मिळेनारूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळदुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. गोवंश हत्याबंदीसह दुष्काळाने बाजारात बैलाचे दर पडले आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून म्हशी विक्रीला काढल्या आहेत. परिणामी बाजारात बैलाच्या जागेवर म्हशी दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळाने शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावर मोठ्या प्रमाणात विक्रीला काढले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याने बैलांचा बाजारच गारद झाला आहे. गाय अथवा बैलांना खरेदी करताच खरेदीदारांवर कायदेशीर बंधने येऊन पडली आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई होत आहे. यामुळे या व्यवसायातून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. मोजकेच व्यापारी व्यवसायात शिल्लक राहीले आहेत. यातून बैलबाजार पूर्णत: गारद झाला आहे. बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी व्यापारी नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना ते खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसा नाही. यामुळे बाजारात बैलाचे दर पडले आहेत. तर गाय खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने बाजारात गाय विक्रीला येत नाही. बैल विक्रीला येतात, मात्र त्याला व्यापारी खरेदी करीत नाही. शेतकरी घेत नाही. यामुळे महिनाभरापासून शेतकऱ्यांना के वळ बैलबाजाराच्या येरझारा माराव्या लागत आहे.बैल नव्हे म्हैस बाजारबैल आणि गाय खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही. मात्र म्हैस खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत, त्यांनी बैलांऐवजी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बैलबाजारात बैल नावालाच आणि म्हशी अफाट, असे चित्र आहे.प्रतिक्रियादुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. बाजारात दर मिळायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या दरात जनावर विकावे लागत आहेत.- अब्दुल रहीम, शेतकरी, आर्वीअलीकडे मजुरीचे दर वाढले. वर्षभर जनावर सांभाळणे अवघड आहे. दुसऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. म्हणून बैल विकायला काढले. पावसाळ्यात कमी पैशात दुसरी जोडी घेण्याचा विचार आहे. - विजय कार, शेतकरी, यवतमाळगत महिनाभरापासून बैल विक्रीसाठी काढले आहेत. मात्र त्याला ग्राहक भेटले नाही. पडलेल्या दरात बैल मागितले जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. - मुकेश ढुमणे, शेतकरी, घारफळसोयाबीन डुबले, दुसरे पीक राहीले नाही. यामुळे कर्ज फेडण्यासाठी बैल विकावे लागत आहे. नुसत्या शेतीवर भागत नाही. यामुळे सारेच शेतकरी चिंतेत आहेत- बाबाराव राठोड, शेतकरी, धामणीयवतमाळच नव्हेतर देवगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, दारव्हा आणि दिग्रस या ठिकाणच्या बैलबाजाराची स्थिती अशीच आहे. - महंमद नासिर, व्यापारी