शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बजेट हजार कोटी, टेंडर पाच हजार कोटींचे; सार्वनिक बांधकाम विभागाचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:08 IST

एका आर्थिक वर्षात एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी देणे शक्य नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय रस्ते निधीचे तब्बल पाच हजार कोटींच्या कामांचे टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय रस्ते निधी आर्थिक तरतूद नसताना काढली कामे, पैशाअभावी मंदगती

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : एका आर्थिक वर्षात एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी देणे शक्य नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय रस्ते निधीचे तब्बल पाच हजार कोटींच्या कामांचे टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी केंद्रीय रस्ते निधीची कामे सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही सुमारे डझनभर कामे केली जात आहे. मात्र काही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. याबाबत माहिती घेतली असता पैसे नसताना बांधकाम खात्याने काढलेल्या ‘बिग बजेट’ निविदांचा घोळ पुढे आला. सूत्रानुसार, बांधकाम खात्याला वर्षभरात एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी देता येत नाही. असे असताना गेल्या वर्षी जानेवारीत या विभागाने केंद्रीय रस्ते निधीतील (सीआरएफ) तब्बल पाच हजार कोटी रुपयांची कामे काढली. ही कामे सुरू झाली मात्र पैसाच नसल्याने कुठे कामे बंद तर कुठे केवळ देखाव्यासाठी संथगतीने सुरू आहेत. गेल्या वर्षी २५ आॅक्टोबरला मुंबईत झालेल्या बैठकीतसुद्धा आर्थिक तरतूद नसताना पाच हजार कोटींचे टेंडर काढले कसे हा मुद्दा उपस्थित झाला होता.

६०० कोटी सहा महिन्यांपासून पडूनकेंद्र शासनाने राज्याला ६०० कोटी रुपयांचा ‘सीआरएफ’ निधी दिला. या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे होते. मात्र ती केली नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ६०० कोटींचा हा निधी पडून आहे. आता डिसेंबरमध्ये आर्थिक तरतूद केल्यानंतर तो खर्च केला जाईल. त्यानंतर केंद्राकडे जानेवारी २०१८ मध्ये पुन्हा एक हजार कोटींच्या निधीची मागणी नोंदविली जाणार आहे.

१६०० कोटींची देयके प्रलंबितराज्यात केंद्रीय रस्ते निधीतील कामांची कंत्राटदारांची १६०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. ‘सीआरएफ’ची ही कामे दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र त्यातील एक वर्ष निघून गेले. आता उर्वरित सहा महिन्यात काम पूर्ण करायचे कसे हा पेच आहे. कारण कंत्राटदारांना पैसाच मिळालेला नाही. यावर्षी मार्चनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला एक पैसाही मिळाला नसल्याचे सांगितले जाते. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच या खात्याची अशी आर्थिक कोंडी केली गेली.

‘अ‍ॅन्युटी’ला प्रतिसाद नाही तरीही तरतूद‘हायब्रीड अ‍ॅन्युटी’ या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३५ हजार कोटींच्या नव्या उपक्रमाला कंत्राटदारांचा वारंवार प्रयत्न करूनही कोणताच प्रतिसाद नाही. त्यानंतरही ‘अ‍ॅन्युटी’साठी शेकडो कोटींची आर्थिक तरतूद आधीच करून ठेवली आहे. कन्सलटंटवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. कंत्राटदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेल्या ‘सीआरएफ’साठी मात्र आर्थिक तरतूदही नाही आणि केंद्राकडून आलेले ६०० कोटीसुद्धा वाटपाऐवजी तिजोरीतच ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Governmentसरकारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग