लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचा विदेशी कंपनीशी झालेला करार संपला आहे. यामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. आता या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र यवतमाळकरांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.या लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्याची गरज नाही. यामुळे ब्रॉडगेज करण्याची मागणी यवतमाळकरांनी केली आहे. याविषयाचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले. या पत्रावर दिनेश दुबे, बाळासाहेब बाजड, दीपक खंडारे, तौकीन खान, बजरंगलाल जोशी, अब्दुल सागीर, शिवकुमार दुबे, रोहीत सोळंके, अनंता पांडे, भारत जामदर, सतीश मडावी आदींची स्वाक्षरी आहे.भूसंपादनाची गरज भासणार नाहीयातील मूर्तिजापूर ते बैतुल आणि यवतमाळ ते मूर्तिजापूर या दोन लाईन लंडनमधील निक्सन कंपनीने करारावर घेतल्या होत्या. या कंपनीचा करार आता संपला आहे.
ब्रिटिशकालीन शकुंतला ब्रॉडगेज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST
१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.
ब्रिटिशकालीन शकुंतला ब्रॉडगेज करा
ठळक मुद्देकरार संपल्याने रेल्वे बंद : यवतमाळकरांचे राष्ट्रपतींना पत्र