आॅनलाईन लोकमतपुसद : येथील तहसील कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या भिंतींनी रविवारी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून आले. ‘झिरो पेंडन्सी अॅन्ड डेली डिस्पोजल’ या अभियानांतर्गत अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या उपक्रमात महसूल प्रशासन आपल्या अभिलेख्यांचे वर्गीकरण करणार आहे.जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये महसूल विभागात अभियान राबविल्या जात आहे. सर्व कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अभिलेखे साठवून राहतात. त्यामुळे कार्यालयीन उपयोगासाठी जागा अपुरी पडते. प्रलंबित प्रकरणांचा शोध घेणे आणि तो निर्गत करणे अवघड होवून जाते. अभिलेख कक्षाचे दरवर्षी अद्ययावतीकरण होत नसल्याने अभिलेख कक्षामध्ये जागाच उपलब्ध राहात नाही. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी जुने अभिलेखे व्यवस्थापन मोहीम रविवारपासून हाती घेण्यात आली आहे.प्रत्येक सुटीच्या दिवशी ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. तहसीलदार डॉ.संजय गरकल यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि गावपातळीवर काम करणारे २५ कोतवाल या मोहिमेत सहभागी झाले.
तहसीलच्या भिंतींनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 21:53 IST
येथील तहसील कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या भिंतींनी रविवारी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून आले.
तहसीलच्या भिंतींनी घेतला मोकळा श्वास
ठळक मुद्देअभिलेख्यांचे वर्गीकरण : पुसद येथे ‘झिरो पेंडन्सी अॅन्ड डेली डिस्पोजल’ अभियान