शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमिअर लीग कबड्डी स्पर्धेत तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:29 IST

प्रिमीअर लीग कबड्डी स्पर्धेत आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाने संतप्त झालेल्या खेळाडूंनी तोडफोड केल्याची घटना येथील नेहरू स्टेडीअमवर रविवारी घडली. खेळाडूंचा संताप पाहून आयोजक पसार झालेत.

ठळक मुद्देनियोजन कोलमडले : खेळाडूंना ट्रॅक सूट न मिळाल्याने संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रिमीअर लीग कबड्डी स्पर्धेत आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाने संतप्त झालेल्या खेळाडूंनी तोडफोड केल्याची घटना येथील नेहरू स्टेडीअमवर रविवारी घडली. खेळाडूंचा संताप पाहून आयोजक पसार झालेत.रविवारपासून २४ जानेवारीपर्यंत बालाजी स्पोर्ट असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय वायपीएल कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुसºयाच दिवशी आयोजकांचे नियोजन कोलडमडल्याने खेळाडूंनी संताप व्यक्त करीत तोडफोड केली. गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नेहरू स्टेडीअमवर २० जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेसाठी येणाºया खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था आयोजकांकडे होती. निवड झालेल्या स्पर्धकांना ट्रॅक सूट देण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्यासाठी आयोजकांनी स्पर्धकांकडून बक्कळ वसुली केली. मात्र स्पर्धा सुरू झाली तरीही ट्रॅक सूट पोहोचले नाही. मोजक्याच खेळाडूंना कीट मिळाली. तीसुद्धा दर्जेदार नसल्याचा आरोप स्पर्धकांनी केला.यामुळे रविवारी खेळाडंूनी प्रचंड संताप व्यक्त केला. स्पर्धास्थळी तोडफोड केली. आयोजकांवर विविध आरोप केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रो-कबड्डी स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पहिल्या दिवशीच नियोजन कोलमडले. भोजन आणि निवासाची व्यवस्था झाली नाही. यामुळे स्पर्धक संतापले. त्यांनी रविवारी तोडफोड करीत खुर्च्यांची फेकाफेक केली. शटर तोडले. तेथे उभारलेला मंडपही फाडून टाकला.या प्रकरणाची काही खेळाडूंनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र वृत्तलिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.