शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘अमृत’साठी फोडलेल्या रस्त्यांवर ब्रेकडाऊन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:49 IST

शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चिखल : अपघात वाढले, घरांचा परिसर तुडुंब भरला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये वाहन घसरून किरकोळ अपघात होत आहे, तर काही ठिकाणी वाहन फसून चक्काजाम होत आहे.शहराच्या सर्वच भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खोदकाम झालेल्या ठिकाणी योग्यरित्या माती टाकली गेली नाही. थातुरमातूर काम करण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे अशा ठिकाणी नाल्या तयार झाल्या आहेत. अर्धा फूटपर्यंत खोल खड्डे झाल्याने विविध प्रकारची वाहने त्यात फसत आहे. आठवडी बाजार परिसराच्या राणी झाँशी चौकात खोदलेल्या नालीत दररोज वाहन फसून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहे. चर्च रोड परिसरातून मार्ग काढण्यासाठीही जागा शिल्लक राहिली नाही. शिवाय गोदणी रोड, उमरसरा, भोसा, वाघापूर, लोहारा, वडगाव आदी भागातही हीच परिस्थिती आहे. हनुमान आखाडा ते चांदणी चौक रस्त्यावरील मातीचे ढीग कायम आहेत.हिंदी हायस्कूल ते वीर वामनराव चौक रस्ता खेड्यालाही लाजविणारा झालेला आहे. आयुर्वेद महाविद्यालय परिसराचीही हिच अवस्था आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून टाकलेले पाईप खोदकाम करताना काढून टाकले. आता पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने लोकांच्या घराचा परिसर तुडुंब भरलेला आहे. घरात पाणी शिरायचे तेवढे बाकी आहे.ग्रामीण भागातही गंभीर प्रश्नआसेगाव(देवी) : बेंबळा प्रकल्पासाठी ग्रामीण भागातून पाईप लाईन टाकण्यात आली. रस्त्यावर सहा ते सात फुटांचा खड्डा खोदण्यात आला. या ठिकाणाची योग्यरित्या दबाई केली गेली नाही. पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये वाहन फसण्याचे प्रकार वाढले आहे. किरकोळ अपघातही नित्याची बाब झाली आहे. राणीअमरावती, गळव्हा, भिसनी हे रस्ते बेंबळाच्या पाईप लाईनसाठी फोडण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात