शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नेर पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 21:54 IST

नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे धरणे : सत्ताधारी म्हणतात, हा तर राजकीय स्टंट, सभा सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले. तर काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करते, त्यांचा हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आली.नगरपरिषदेच्या कुठल्याही सभेपूर्वी त्याची नोटीस व टिपणी नगरसेवकांना मिळावी, हा मुद्दा काँग्रेस नगरसेवकांनी लाऊन धरला होता. नेमकं अर्थसंकल्पीय सभेतही वेळेवरच अर्थसंकल्पाच्या कॉपीज् देण्यात आल्या. यावरून काँग्रेस नगरसेवक सलीम शहा यांनी सभागृहातून वॉकआऊट करून निदर्शने सुरू केली. पालिकेबाहेर नगरसेवक जफर एन. खान, इरशाद खान, फारूक दिवानजी, अन्सार खान, अतुल पिंपळकर, साजीद खाँ जबीउल्ला खाँ, रेहान खान, सत्यविजय गुल्हाने, फिरोज खान या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले.नगरपरिषदेत शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. संख्याबळाच्या भरवशावर अर्थसंकल्पीय सभा सुरू झाली. नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल व उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या उपस्थितीत २०१९-२० चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पीय सभेची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार असून काँग्रेसकडून केवळ राजकीय स्टंट केला जात असल्याचे नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर अर्थसंकल्पाचा अभ्यास व्हावा यासाठी त्याची प्रत चार दिवसांपूर्वीच नगरसेवकांना मिळणे अपेक्षित आहे. येथे ऐनवेळेवर प्रत देऊन मंजुरीसाठी ठेवली जाते, असे अ‍ॅड. सलीम शहा यांनी सांगितले.३२ कोटी ६५ लाखांचा अर्थसंकल्पनेर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देण्यात आला. पालिकेत ३२ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांचा येणारा निधी व खर्च होणारा निधी याचा लेखाजोखा मांडण्यात आला. २०१७-१८ या वर्षातील दोन कोटी ५७ लाख ५२ हजार रुपये नगरपालिकेकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. एकंदर अडीच कोटींच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी भरघोस तरतूद केली. यात पालिका शाळांसाठी नवीन डेस्क, बेंच, शालेय पुस्तके यांचा समावेश असल्याचे नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल व मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले.