शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:46 IST

यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.

ठळक मुद्देअमेरिकेच्या धोरणाने झटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.जागतिक बाजारातील कापसाचे दर आणि भारतातील दर सारखेच आहे. या स्थितीत अमेरिका भारतातील व्यापाऱ्यांना उधारीवर कापूस विकण्यास तयार आहे. या कापूस गाठीला तीन ते चार महिन्यांची सवलत मिळाली आहे. यामुळे चिन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अमेरिकेने भारतालाच ढाल बनवून भारतीय बाजारपेठ काबीज करणे सुरू केले आहे.दोन वर्षांपासून अमेरिका याच पद्धतीने कापूस गाठींची विक्री करीत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना बसत आहे. हा प्रकार नियंत्रित करण्यासाठी कापसाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलावे, असे मत शेतकरी संघटनानी नोंदविले आहे. कृषी अभ्यासकांनी त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’कडे नोंदविले आहे.उधारीवरील कापसामुळे देशभरात कापसाच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. गत तीन महिन्यापासून घसरण होत आहे. कापसाचे दर क्विंटलमागे ६०० रूपयाने घटले आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सहा हजार रूपये क्विंटलच्या वर जातील, असा अंदाज होता. मात्र अमेरिकेच्या व्यापार धोरणाने भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.पाकिस्तानचे कापूस सौदे रद्दभारतातून २० लाख कापूस गाठीची निर्यात होणार होती. यातील ७ लाख गाठीचे सौदे झाले. मात्र दहशतवादी घटनांमुळे दोन लाख गाठी थांबविण्यात आल्या. पुढील कालावधीत जाणारा कापूस यामुळे थांबणार आहे.उधारीवरच्या २७ लाख गाठी देशभरातबहुराष्ट्रीय कंपनीकडून भारतात येणाºया कापूस गाठीचे वितरण करण्यात येते. गतवर्षी २० लाख गाठी आयात झाल्या होत्या. यावर्षी याा गाठी २७ लाखांवर पोहचल्या आहे. यातून बाजारात कापसाचे दर पडले आहेत.आयात होणाºया कापसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्याकरिता आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. किमान आधारभूत किमतीखाली शेतमालाची आयातच करू नये.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धाकापसाच्या आयातीवर निर्बंधाचे प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. यामुळे २० टक्के कापसाची आयात झाली. यातही उधारीवर कापूस देशात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे.- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग

टॅग्स :agricultureशेती