शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ऐनवेळी बोरेलेंना हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:27 IST

पांढरकवडा पालिका निवडणूक : समर्थकांमध्ये रोष, छावणीत शुकशुकाट, भव्य तयारीवर पाणी फेरलेनरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : भाजपातर्फे पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत खुशी बोरेले यांना नगराध्यक्षपदाची तिकीट मिळेलच, हे जवळपास निश्चित झाले असताना व बोरेले यांच्या समर्थकांनी नामांकन दाखल करण्यासाठी भव्य तयारी केली असताना, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऐनवेळी खुशी ...

ठळक मुद्देपांढरकवडा पालिका निवडणूक : समर्थकांमध्ये रोष, छावणीत शुकशुकाट, भव्य तयारीवर पाणी फेरले

पांढरकवडा पालिका निवडणूक : समर्थकांमध्ये रोष, छावणीत शुकशुकाट, भव्य तयारीवर पाणी फेरलेनरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : भाजपातर्फे पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत खुशी बोरेले यांना नगराध्यक्षपदाची तिकीट मिळेलच, हे जवळपास निश्चित झाले असताना व बोरेले यांच्या समर्थकांनी नामांकन दाखल करण्यासाठी भव्य तयारी केली असताना, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऐनवेळी खुशी बोरेले यांना हुलकावणी देत श्रद्धा तिवारी यांना तिकीट देण्यात आले. यामुळे बोरेले समर्थकांना चांगलाच धक्का बसला. अकस्मात घडलेल्या या घडामोडीने शुक्रवारी पांढरकवडातील राजकारण ढवळून निघाले.१३ डिसेंबर रोजी होणाºया पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच येथील युवा उद्योजक आतिश बोरेले यांच्या पत्नी खुशी बोरेले यांचे नाव भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी अग्रक्रमावर होते. या भागाचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर व आमदार राजू तोडसाम यांनीदेखील अध्यक्षपदाच्या उमेदवार खुशी बोरेले याच राहतील, आपण तयार करा असे आतिश बोरेले यांना सांगितले. परंतु मध्यंतरी शिवसेनेच्या उमेदवार राधिका बोरेले यांचे पती संतोष बोरेले यांनी खुशी बोरेले यांना निवडणूक लढवू नये, यासाठी आतिश बोरेलेंची मनधरणी केली. यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही त्यांच्यावर दबाव आला.त्यामुळे त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी आतिश बोरेले यांनी पत्रकार परिषद घेऊन कौटुुंबिक संबंध चांगले रहावे, म्हणून खुशी बोरेले या निवडणूक लढणार नाहीत, असे जाहीर केले. ही बाब ना.हंसराज अहीर व आ.राजू तोडसाम यांना कळताच, त्यांनी लगेच आतिश बोरेले यांच्याशी संपर्क साधला व भाजपातर्फे अध्यक्षपदाची निवडणूक खुशी बोरेले यांनाच लढवावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर आतिश बोरेले निवडणुकीच्या तयारीला लागले.शुक्रवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खुशी बोरेले यांचे नामांकन दाखल करण्यासाठी आतिश बोरेले व त्यांच्या समर्थकांनी पांढरकवडातील एका मंगल कार्यालयात जय्यत तयारी केली. मिरवणुकीने नामांकन दाखल करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांनी मंगल कार्यालय परिसरात गर्दी करायला सुरूवात केली होती.तीन क्विंटलचा भात अन् अकोल्याचे बॅन्डपथक