शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक वितरण जबाबदारी केंद्रप्रमुखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:37 IST

दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मिळणारी शाळांची पुस्तके यंदा एकाच टप्प्यात प्राप्त झाली असून या पुस्तक वितरणाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे. वणी पंचायत समितीसाठी यावर्षी नव्या सत्राकरिता ८७ हजार ३१६ पुस्तके मिळाली आहे.

ठळक मुद्देवणीसाठी ८७ हजार पुस्तके : ग्रामीण भागात वाटप सुरू, एकाच टप्प्यात पुस्तके प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मिळणारी शाळांची पुस्तके यंदा एकाच टप्प्यात प्राप्त झाली असून या पुस्तक वितरणाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे. वणी पंचायत समितीसाठी यावर्षी नव्या सत्राकरिता ८७ हजार ३१६ पुस्तके मिळाली आहे. ही पुस्तके ग्रामीण भागात पोहचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी त्याचे वितरण होणार आहे.वणी पंचायत समितीअंतर्गत एकूण १३ केंद्र असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या १३९ शाळा आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठविच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या १३९ शाळा तसेच वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १३ केंद्रांच्या अखत्यारित येत असलेल्या खासगी अनुदानीत शाळांना या पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.वणी पंचायत समितीअंतर्गत रासा केंद्रात चार, कायर केंद्रात एक, नेरड केंद्रात दोन, चिखलगाव केंद्रात चार, राजूर केंद्रात पाच, शिंदोला केंद्रात एक, शिवणी केंद्रात एक, शिरपूर केंद्रात चार, नायगाव केंद्रात एक, भालर केंद्रात एक, सावर्ला केंद्रात दोन, वांजरी केंद्रात दोन, तर वेळाबाई केंद्रात एक, अशा एकूण २९ खासगी अनुदानीत शाळा आहेत. १३९ जिल्हा परिषद शाळांसह या २९ शाळांसाठी पुस्तके रवाना करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर एक दिवस ठरवून पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.यापूर्वी वणी पंचायत समितीच्या बिआरसीमधून केंद्रप्रमुखांना संबंधित शाळांसाठी पुस्तके दिली जायची. परंतु केंद्रप्रमुख आपल्यावरील जबाबदारी इतर कुणावर तरी सोपवून मोकळा व्हायचा. परिणामी पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हती. परंतु आता पुस्तक वितरणाची संपूर्ण जबाबदारीच केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आल्याने गोंधळ उडाल्यास त्यासाठी केंद्र प्रमुखाला जबाबदार धरण्यात येणार आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत वेळेच्या आत पोहोचणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावी, असे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.गणितासह सर्व विषयांची पुस्तके उपलब्धदरवर्षी दोन ते तीन टप्प्यात पुस्तके पाठविली जायची. परंतु यावर्षी पहिल्यांदाच सर्व विषयांचे पुस्तके एकाच टप्प्यात प्राप्त झाली आहे. चौथीच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाचे पुस्तकदेखील एकाचवेळी उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Educationशिक्षण