शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख हेक्टरवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:02 IST

जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या.

ठळक मुद्देतीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी : अर्ज भरणाऱ्यांनाच मदतीचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. तथापि नुकसानीचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा चार लाख ५६ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी तब्बल दोन लाख १३ हजार हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी गँगने हल्ला केला आहे. बीटी वाणाच्या कपाशीवर बोंअडळी हल्ला करीत नाही, असा दावा बियाणे कंपन्यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बीटी कपाशीचा पेरा वाढला. आता तर सर्वच शेतकरी बीटी बियाण्यांची लागवड करतात. मात्र याच कपाशीवर आता गुलाबी ओंबडळीने हल्ला केल्याने शेतकरी पुरते कोलमडून पडले आहे. त्यांना काय करावे, हे सुचेनासे झाले आहे.कृषी विभागाने कपाशीचे तब्बल ५० टक्के क्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधीत झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी ‘जे’ आणि ‘एच’ फॉर्ममध्ये नुकसानीचा अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या शेतातील नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातही ५० टक्केपेक्षा जादा नुकसान झाल्यासच नुकसान भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. जे शेतकरी अर्ज भरणार नाही, त्यांच्या शेतातील नुकसानीचे सर्वेक्षणही केले जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा नुकसान होईनही त्यांना मदत मिळणे कठीण होणार आहे. परिणामी शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.नुकसान नैसर्गिक आपत्ती नाहीजिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळीने झालेले नुुकसान नैसर्गिक आपत्तीत मोडत नाही. त्यामुळे कृषी विभागाने सुरूवातीला चक्क सर्वेक्षण करण्यास नकार दिला होता. हा प्रकार कीड सर्वेक्षण नियमात मोडतो. तथापि जिल्ह्यात कीड सर्वेक्षकांची संख्या कमी आहे. आता अपुऱ्या सर्वेक्षकांना हा सर्वे पूर्ण करावा लागणार आहे. कृषी विभागाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली आहे.