शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीला जाणारे बोगस बियाणे जप्त, कृषी विभागाची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 21:18 IST

मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली

यवमाळ : मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली. त्यांनी सहका-यांच्या मदतीने चापडोह चौफुलीवर सापळा रचून दुचाकीस्वार दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल १५० बॅग बोगस बियाणे जप्त केले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९.३० वाजता केली. 

पंकज भोयर (२९) रा. वैद्यनगर, अविनाश राठोड (२४) रा. वडगाव रोड, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.२९-ए.एस.६८१२) अकोलाबाजारकडे जात होते. दुचाकीवरून प्रतिबंधीत बियाणे विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे यांनी सापळा रचला. मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षण अधिकारी नितेश येळवे यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पाडली. यात अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील जमादार सुरेश मेश्राम, संजय राठोड यांची मदत घेण्यात आली. 

आरोपींनी बोगस बिटी बियाणे वर्धा येथून आणल्याची क बुली दिली. त्यांच्याजवळून जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये ‘बीगबोल-२ रिकॉट-६’ याच्या १०० बॅग, तर कावेरी सिड्सची डुप्लीकेट ‘एटीएम’ च्या ५० बॅग जप्त केल्या. हर्बीसाईड टॉलरन्स असलेली ही बीटी आहे. हे बियाणे लागवड केलेल्या शेतात ग्लायकोसेड हे तणनाशक फवारणी करता येते. यामुळे इतर पिकांवर विपरित परिणराम होतो. शिवाय पर्यावरणाचीही मोठी हानी होते. ग्यालकोसेड फवारणी केलेल्या शेतात पुढील हंगामात गहू व इतर कोणतेही धान्य पीक घेतल्यास कर्करोगाचा धोका दुप्पटीने वाढतो. अशा बियाण्यावर देशात बंदी आहे. त्यानंतरही त्याचा चोरटा व्यापार जोरात सुरू आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी घोंगडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, बियाणे कायदा १९६६ मधील कलम ७ ते १४, जीवनाश्यक वस्तू कायदा आणि आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यापूर्वी घाटंजी येथे बोगस बियाण्याचा मोठा साठा सापडला होता.