शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीला जाणारे बोगस बियाणे सापळा रचून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:22 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : चापडोह चौफुलीवर १५० बॅगसह दुचाकीस्वारांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चापडोह चौफुलीवर सापळा रचून दुचाकीस्वार दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल १५० बॅग बोगस बियाणे जप्त केले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९.३० वाजता केली.पंकज भोयर (२९) रा. वैद्यनगर, अविनाश राठोड (२४) रा. वडगाव रोड, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.२९-ए.एस.६८१२) अकोलाबाजारकडे जात होते. दुचाकीवरून प्रतिबंधीत बियाणे विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे यांनी सापळा रचला. मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षण अधिकारी नितेश येळवे यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पाडली. यात अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील जमादार सुरेश मेश्राम, संजय राठोड यांची मदत घेण्यात आली.आरोपींनी बोगस बिटी बियाणे वर्धा येथून आणल्याची क बुली दिली. त्यांच्याजवळून जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये ‘बीगबोल-२ रिकॉट-६’ याच्या १०० बॅग, तर कावेरी सिड्सची डुप्लीकेट ‘एटीएम’ च्या ५० बॅग जप्त केल्या. हर्बीसाईड टॉलरन्स असलेली ही बीटी आहे. हे बियाणे लागवड केलेल्या शेतात ग्लायकोसेड हे तणनाशक फवारणी करता येते. यामुळे इतर पिकांवर विपरित परिणराम होतो. शिवाय पर्यावरणाचीही मोठी हानी होते. ग्यालकोसेड फवारणी केलेल्या शेतात पुढील हंगामात गहू व इतर कोणतेही धान्य पीक घेतल्यास कर्करोगाचा धोका दुप्पटीने वाढतो. अशा बियाण्यावर देशात बंदी आहे. त्यानंतरही त्याचा चोरटा व्यापार जोरात सुरू आहे.याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी घोंगडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, बियाणे कायदा १९६६ मधील कलम ७ ते १४, जीवनाश्यक वस्तू कायदा आणि आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यापूर्वी घाटंजी येथे बोगस बियाण्याचा मोठा साठा सापडला होता.

टॅग्स :Crimeगुन्हा