शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर पकडला, सूचनापत्र देऊन सोडला! रुग्णांच्या जीवाशी खेळ

By सुरेंद्र राऊत | Updated: June 19, 2024 18:50 IST

यवतमाळघाटंजी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील दुर्गम भागातील भांबाेरा प्राथमिक आराेग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या बाेरगाव पुंजी येथे बाेगस डाॅक्टरने आपले दुकान थाटले हाेते.त्याच्यावर मंगळवारी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.काेलकाता येथून आलेल्या युवकाने डाॅक्टर बनून गरीब ग्रामीण रुग्णांवर उपचार करणे सुरू केले.त्याच्याकडे काेणाचेही लक्ष नव्हते.अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही कारवाई केली.त्याच्याकडून ११ हजारांची औषधे जप्त केली आहेत.घाटंजी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.ही कारवाई करण्यात संपूर्ण दिवस गेला.यानंतर आराेपी असलेल्या युवकाला पाेलिस ठाण्यात आणल्यानंतर काही तासातच सूचना पत्र देऊन साेडून देण्यात आले. 

बोरगाव पुंजी येथे अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय करत असलेल्या मिथुन बिस्वास याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी भांबाेरा आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शुभम संजय वाडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोधून कारवाई करण्यासाठी असलेल्या विस्तार अधिकारी अरुण खांडरे, अन्न निरीक्षक संजय माेहनसिंग राठोड, डॉ.धर्मेश चव्हाण यांच्या पथकाने बाेरगाव पुंजी येथील वाॅर्ड क्र.१ मध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारा मिथुन बिश्वास याच्याकडे छापा टाकला.ताे मूळ राहणारा पश्चिम बंगालचा असून, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करावयाचे कागदपत्रं आढळून आलेले नाहीत.तसेच त्याच्याकडे औषध, इंजेक्शन व इतर वैद्यकीय उपचाराच्या वस्तू असा ११ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल मिळाला.डॉक्टर म्हणून रुग्णांना सेवा द्यायची असल्यास त्यांना महाराष्ट्र सेवा अधिनियम १९६१ मधील कलम ३३(२) ३३ अ अन्वये औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे सहवाचन १८ अ संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.त्यानुसार मिथुन बिश्वास याच्याकडे काेणतेही प्रमाणपत्र व नाेंदणी आढळली नाही.त्यामुळे कारवाई करत या बाेगस डाॅक्टरला ताब्यात घेत घाटंजी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र काही वेळानंतर या डाॅक्टरची लगेच सुटका करण्यात आली. कायद्यातील तरतुदीनुसार या गुन्ह्यासाठी केवळ दाेन वर्षांची शिक्षा असल्याने त्या बाेगस डाॅक्टरला सूचना पत्र देऊन साेडून दिले आहे.तसेच तपासासाठी त्याला वेळाेवेळी पाेलिस ठाण्यात बाेलाविण्यात येईल, असे घाटंजी ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. 

टॅग्स :Courtन्यायालयdoctorडॉक्टर