शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लोहारा एमआयडीसीत युवकाचा जळालेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:37 IST

शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जळालेला मृतदेह असल्याने घातपात घडविल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देघातपाताचा संशय : बुधवारी रात्रीपासून बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जळालेला मृतदेह असल्याने घातपात घडविल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.भूषण गंगाधर मेश्राम (२१) रा. मामानगरी असे या मृत युवकाचे नाव आहे. भूषण हा बुधवारी रात्री ९ वाजतापासून घरुन बेपत्ता होता. तो सायकल घेऊन निघून गेला. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्याचे आई-वडील लोहारा पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार घेऊन आले होते. दरम्यान अवधूतवाडी ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका टेकड्यावर युवकाचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या ठाण्यांमध्ये मिसिंग तक्रार आहे काय, याची पडताळणी केली.यावरून हा मृतदेह भूषणचा असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय त्याच्या आई-वडिलांनीही ओळख पटविली आहे. भूषणला नेमके कोणी जाळले, त्याची हत्या झाली की आत्महत्या आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. 

टॅग्स :Murderखून