शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

By admin | Updated: December 25, 2014 23:38 IST

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली.

हिवरी : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली. घटनास्थळ जंगलात असल्याने मुलगी तेथे पोहोचली कशी, घातपात तर झाला नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. मोहिनी किरण गायकवाड (१६) रा. झाडकिन्ही असे मृत मुलीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विमनस्क वागायची. त्यामुळे यवतमाळच्या दांडेकर ले-आऊटमध्ये राहणाऱ्या अश्विनी किरण गायकवाड या मोठ्या बहिनीने महिनाभरापूर्वी तिला आणले. २३ डिसेंबरपासून ती घरून बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला, मात्र आढळून आली नाही. त्यामुळे मोहिनी हरविल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दिली होती. गुरूवारी सकाळी किन्ही शिवारातील शेतात कामासाठी पंडीत आखरे गेले असता त्यांना कुजल्यासारखा वास आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर काळी टी-शर्ट आणि जिन्स घातलेली मुलगी त्यांना मृतावस्थेत दिसली. घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावरून फौजदार मिश्रा, जमादार नरेंद्र लावरे, महेश फुन्से, नरेश खरतडे आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोहिनीचे नातेवाईकही तेथे पोहोचले. यावेळी त्यांनी मृतदेहाची पाहणी करून ती मोहिनीच असल्याची ओळख पटविली. पोलिसांनी तुर्तास याप्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मात्र मोहिनीचा घातपात झाला असावा असा संशयही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)