शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

भाजपा खासदार-आमदारांत मतभेद

By admin | Updated: February 21, 2016 01:50 IST

भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे.

जिल्हाध्यक्ष निवड : प्रदेशाध्यक्षांचा ‘रिपीट’चा निर्णय धुडकावला यवतमाळ : भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. त्यातूनच प्रदेश कार्यालयाने जिल्हाध्यक्ष ‘रिपीट’चा पाठविलेला निर्णय येथे रोखण्यात आला आहे. केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असल्याने भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाला वेगळेच वजन निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी भाजपात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. कुणाच्या गटाचा जिल्हाध्यक्ष व्हावा यावरून आता नेत्यांमध्येही गट पडले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या नावाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची पसंती आहे. म्हणूनच ना. अहीर हे डांगे यांना खास प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी चार दिवसांपूर्वी पुण्यात व नंतर मुंबईत घेऊन गेले होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा आग्रह पाहता त्यांनी सूचविलेल्या नावाला प्रदेशाध्यक्षांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे सांगितले जाते. मात्र ‘जिल्हास्तरावरील विरोध तुम्ही शमवा’ अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. डांगे यांना रिपीट केले जाणार असल्याचे वृत्त धडकताच भाजपाची स्थानिक नेते मंडळी आणि आमदार अस्वस्थ झाले. त्यांनी प्रदेश महामंत्री रवी भुसारी यांना संपर्क केला. प्रदेशाध्यक्षांच्या आग्रहापुढे आपला नाईलाज झाल्याचे उत्तर त्यांच्याकडून दिले गेल्याचे सांगितले जाते. ना. हंसराज अहीर यांनी प्रदेशाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्ष पदाचे गणित शिजवून आणल्याने येथील आमदार मंडळी व पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात ठरणार की मुंबईत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून खासदार व आमदार यांच्यातील मतभेदही उघड झाले. आमदारांचा विरोध झुगारुन खासदारांनी आपल्या सोईचा जिल्हाध्यक्ष बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या तरी या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही. राजेंद्र डांगे मात्र ‘आपणच रिपीट होणार, प्रदेशने ग्रीन सिग्नल दिला, स्थानिक विरोधही निपटून काढू’ असे कार्यकर्त्यांना दाव्याने सांगताना दिसत आहे. तर रिपीट होऊ नये म्हणून भाजपातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते आणि विशेषत: संघ परिवार कामी लागल्याचे जिल्ह्याचे नेतृत्व खासदार ठरविणार की आमदार असा वाद भाजपात आता सुरू झाला आहे. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. अहीर यांच्या विरोधात यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या निमित्ताने उघड भूमिका घेतली आहे. वणीचे आमदार अहिरांच्या बाजूने आहे. उर्वरित चार आमदारांचा अजेंडा उघड झाला नसला तरी त्यांचीही भूमिका ‘रिपीट’ होऊ नये अशीच असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)