शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

सेना वरचढ होण्याची भाजपाला भीती

By admin | Updated: December 4, 2014 23:15 IST

जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ

मंत्रिपदासाठी लॉबिंग : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला यवतमाळ : जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ होण्याची हूरहूर भाजपा नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच या नेत्यांनी भाजपालाही जिल्ह्यात मंत्रीपद मिळावे म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली आहे.जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे एक शिष्टमंडळ सकाळीच नागपूरला रवाना झाले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४ ची वेळ भेटीसाठी दिली आहे. त्यानंतर ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा विदर्भातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात जिल्ह्यातील भाजपाच्या तीन आमदारांसह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ आमदार मदन येरावार यांना ५ डिसेंबरच्या विस्तारात मंत्रीपद मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे. त्याच प्रमाणे येरावार यांचे राजकीय गॉडफादर असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडूनही मंत्रीपदाबाबतचा शब्द मिळविण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न राहणार आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होत आहे. सेनेच्या वाट्याला पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्रीपदे येणार आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख संजय राठोड यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे विस्तारात भाजपाच्या वाट्याला केवळ आठ जागा येणार असल्याने आणि इच्छुकांची रांग बरीच मोठी असल्याने जिल्ह्यातून आतापर्यंत निश्चित मानल्या जाणाऱ्या मदन येरावार यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली. विशेष असे, या शिष्टमंडळात खुद्द मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मदन येरावार यांचाच समावेश नाही. यावरून येरावार यांनीच हे शिष्टमंडळ पाठविले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपाचे जिल्ह्यातील अन्य आमदार पहिल्यांदाच निवडून आल्याने ‘तुम्हाला आत्ताच संधी नाही’ असे म्हणून त्यातील तिघांना लॉबिंगसाठी शिष्टमंडळात समाविष्ठ करून घेण्यात आले आहे. विशेष असे, या चार पैकी आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी आपल्याला मंत्रीपद मिळावे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत जोरदार फिल्डींग लावली आहे. विदर्भातून आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे म्हणून तोडसाम प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यात भाजपाला मंत्रीपद न मिळाल्यास पक्षाचे वजन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला न मिळाल्यास सेनेचे जिल्हाभर नेटवर्क निर्माण होईल, प्रशासनावरही सेनेचीच पकड राहील. एक आमदार असूनही सेना वरचढ तर पाच आमदार असूनही भाजपा राजकीयदृष्ट्या मागे फेकली जाण्याची हूरहूर व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे नेटवर्क वाढल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपावर शिवसेना वरचढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच आधार घेऊन भाजपाचे शिष्टमंडळ मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करीत आहे. मात्र येरावार यांच्यावर पूर्णत: गडकरींचा लागलेला शिक्का, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेला सलोखा, बिल्डर लॉबीशी हितसंबंध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळाला किती गांभीर्याने घेतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)