शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बाईकचे इंजिन बदलून देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:33 IST

नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : साई पॉर्इंट व होंडा मोटर्सला चपराक, वॉरंटी काळातही विविध चार्जेस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.आर्णी तालुक्याच्या साकूर येथील शेतकरी शिवराज अशोकराव शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे व सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.शिवराज शिंदे यांनी यवतमाळ येथील साई पॉर्इंट आॅटो प्रा.लि.मधून होंडा बाईक (शाईन) खरेदी केली. तेथून १० ते १२ दिवसापासूनच इंजिनमधून आवाज सुरू झाला. साई पॉर्इंटमध्ये दाखविली असता आपोआप बंद होईल, असे सांगितले गेले. हा दिवस उजाडलाच नाही. दरम्यान, विविध प्रकारच्या दुरुस्त्या केल्या गेल्या. वॉरंटी कालावधी असतानाही शिंदे यांच्याकडून दुरुस्ती आणि इतर स्पेअर पार्टच्या नावाखाली रक्कम घेण्यात आली. २० हजार ९४३ रुपये ९६ पैसे एवढा खर्च त्यांना करावा लागला. तरीही आवाज कमी झाला नाही.अखेर शिवराज शिंदे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. दाखल तक्रारीवर दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मंचाने आपला निकाल दिला. वाहनात उत्पादकीय दोष असताना चुकीची व तर्काला न पटणारी कारणे दिली, तक्रारकर्त्याची दिशाभूल केली, सदोष सेवा दिली. त्यामुळे साई पॉर्इंट आॅटो प्रा.लि. आणि होंडा मोटर्स लि. पुणे यांनी शिंदे यांच्या दुचाकीचे इंजिन बदलवून सुस्थितीतील वाहन द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाचे पाच हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे.वाहन निष्काळजीपणे चालविल्याचा ‘साई’तर्फे युक्तिवादवाहन निष्काळजीपणाने चालविल्याने त्यात दोष निर्माण झाला. वाहनधारकाला तोंडी सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार क्लच दाबणे, ब्रेकिंग करणे, अयोग्यवेळी गिअर बदलविणे आदी प्रकारामुळे वाहनात बिघाड झाला, अशी बाजू साई पॉर्इंटतर्फे कारवाई दरम्यान मांडण्यात आली होती.

टॅग्स :Courtन्यायालयHondaहोंडा