संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत महागाव तालुक्यातील काळी दौ. येथे तालुक्यातील सर्वात मोठी घरकूल योजना साकारली जाणार आहे. एकाच ठिकाणी तब्बल २७ घरकुलांना मंजुरी मिळाली असून प्लॉट खरेदीसाठी १७ लाखांचा निधी महागाव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.काळी येथील सरपंच गौतम रणवीर आणि सचिव व्ही.सी. कोषटवार यांच्या परिश्रमातून ही योजना पूर्णत्वास जात आहे. काळी येथील गरजू पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना घरकूल बांधण्यासाठी प्लॉटची आवश्यकता होती. प्लॉट खरेदीसाठी प्रत्येकाला ५० हजार रुपये मंजुरीचा प्रस्ताव गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी मंजूर करून घेतला. स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला. काळी येथे त्यामुळेच तालुक्यातील मोठी घरकूल योजना उभारली जात आहे.काळी येथे प्रत्येक लाभार्थ्याला ५०० चौरस फूट जागा मंजूर केली आहे. विविध ठिकाणी जागा घेवून बांधण्यापेक्षा एकाच ठिकाणी २७ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. जागा खरेदीसाठी प्रोत्साहन ५० हजार रुपये आणि लाभार्थी सहभागातून कमीत कमी पैशात ही योजना साकारली जाणार आहे. या सोबतच कासारबेहळ येथे चार आणि कौडगाव येथे एका घरकुलाला मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून जमीन खरेदीचे प्रस्ताव तयार केले तर तालुक्यातील सर्वांना निवारा मिळणार आहे.
काळी येथे सर्वात मोठी घरकूल योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:37 IST
पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत महागाव तालुक्यातील काळी दौ. येथे तालुक्यातील सर्वात मोठी घरकूल योजना साकारली जाणार आहे.
काळी येथे सर्वात मोठी घरकूल योजना
ठळक मुद्देनिधी प्राप्त : एकाच ठिकाणी २७ घरकूले