शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव शौर्यदिन स्मृती समारोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:00 IST

भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम : कलावंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ३, ४ आणि ५ जानेवारी रोजी समता मैदानावर सायंकाळी व्याख्यानासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रविवारी आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.संविधानिक विचार मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती तथा आंबेडकरी कवी-गायक बहुउद्देशीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह होत आहे. यात ३ जानेवारीला सायंकाळी ‘भिमा कोरेगाव संग्राम इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाचे मुख्य अभिनेते व आंबेडकरी विचारवंत विरा साथीदार हे व्याख्याते आहेत. उद्घाटन धम्मभूमी मासिक पत्रिकेचे संपादक विजय डांगे यांच्या हस्ते होईल. तसेच नागपूर येथील परमानंद भारती आणि बाभ भीमराव चित्रपटाच्या निर्मात्या निशाताई भगत यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.४ जानेवारीला ‘बौद्धांच्या समरगाथा’ या विषयावर मुंबईचे विवेक मोरे यांच्या व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भस्मे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला उपस्थित राहणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध गायक अश्विनी राजगुरू, स्थानिक कलावंत प्रबोधनकार मानकर बाबू कव्वाल व मदन वरघट कव्वाली सादर करणार आहेत.५ जानेवारीला ‘आंबेडकरी आंदोलनाची दिशा’ या विषयावर दिल्लीचे उमेदसिंह गौतम यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. रामदास राऊत असून प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, समता पर्वाचे अध्यक्ष किशोर भगत उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात गजानन कांबळे, स्पंदन ग्रूप क्रांती गीते सादर करतील. आवाज भीम लेकरांचा या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी होईल. तसेच प्रकाश खरतडे ‘मी भीमाचा दिवाना’ ही एकपात्री नाटिका सादर करणार आहेत.पत्रकार परिषदेला के. एस. नाईक, अश्विंद खरतडे, विजय डांगे, रवी श्रीरामे, माया गजभिये, राहुल पाते, विष्णू भितकर, रमेश जीवने, दत्तात्रय सूर्यवंशी, मनोज वाघमारे, मनोज हुमणे, मुकुंद दारुंडे, सुधाकर धोंगडे, पवन इंगोले, हरिदास मेश्राम, जितेंद्र ढानके, सुनिल बन्सोड, आनंद भगत, अक्षय खोब्रागडे, सिद्धार्थ भवरे, शैलेश उके, उमेश मोहोड, मदन वरघट, वासुदेव मानकर, नामदेव स्थूल, प्रमोदिनी रामटेके, रविता भोवते, स्नेहल नगराळे, सुनंदा राऊत आदी उपस्थित होते.दररोज गीत गायन स्पर्धाभिमा कोरेगाव शौर्य दिन द्विशताब्दी समारोहात दररोज गीत गायन स्पर्धा रंगणार आहे. ३, ४ आणि ५ जानेवारीला रात्री बुद्ध, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी, आई सावित्री, आई रमाई यांच्या जीवनावरील गीते यात सादर होणार आहेत. अंतिम फेरीत विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. तसेच भारतीय संविधानावर आधारित प्रश्नपत्रिका स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव केला जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.