शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:48 IST

बाभूळगावात टायर जाळले, शाळा-महाविद्यालयांना सुटी, एसटी फेऱ्या रद्द, प्रवासी खोळंबले, पोलिसांचा तगडा बंदोबस्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. लहान-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदला साथ दिली. शाळा, महाविद्यालयांनी सकाळीच सुटी जाहीर केली. मात्र, एसटी महामंडळाने बसफेऱ्या रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले.भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ ...

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, आंदोलन शांततेत

बाभूळगावात टायर जाळले, शाळा-महाविद्यालयांना सुटी, एसटी फेऱ्या रद्द, प्रवासी खोळंबले, पोलिसांचा तगडा बंदोबस्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. लहान-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदला साथ दिली. शाळा, महाविद्यालयांनी सकाळीच सुटी जाहीर केली. मात्र, एसटी महामंडळाने बसफेऱ्या रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले.भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी विविध संघटनांनी जिल्हा बंदची हाक दिली होती. जिल्ह्यातील व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदला साथ दिल्याने जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. यवतमाळसह जिल्ह्यातील एकाही एसटी आगारातून एकही एसटी बस बाहेर पडली नाही. त्यामुळे सर्वत्र प्रवासी खोळंबले होते. यवतमाळसह वणी, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, नेर, मारेगाव, झरी, घाटंजी, राळेगाव, दिग्रस, महागाव, कळंब, फुलसावंगी येथेही कडकडीत बंद होता. बाभूळगाव येथे युवकांनी रस्त्यावर टायर जाळून घटनेचा निषेध केला.यवतमाळात बसस्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले. तेथे केंद्र व राज्य शासन, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. काही युवकांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. दुपारी विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी बसस्थानक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. यात सर्वात समोर मुली, नंतर महिला आणि नंतर पुरुष, असा क्रम होता. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्याचवेळी बसस्थानक चौकात महिलांनी मानवी साखळी तयार करून नागपूर, वर्धा, दारव्हा, आर्णी, पुसद, अमरावती, धामणगावकडे जाणारी सर्वच वाहतूक रोखून धरली. केवळ रूग्णवाहिकेला जाऊ देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.निवेदनातून भिमा-कोरेगाव येथे दगडफेकीत मृत्यू पावलेल्या राहुल खोब्रागडे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत जाहीर करावी, त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी द्यावी, जखमींचा शासनाने उपचार करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, मिलींद एकबोटे आणि इतरांना त्वरित अटक करावी, दगडफेकीत नुकसान झालेल्या वाहनधारकांना भरपाई द्यावी, निष्काळजी पोलिसांवर कारवाई करावी, या घटनेची पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.विविध संघटनांचा सहभागबंदमध्ये भारिप-बहुजन महासंघ, प्रहार संघटना, मराठा सेवा संघ, दि बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशन, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, बहुजन रिपब्लिकन पार्टी, महाबोधी मुक्ती आंदोलन, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना, बीआरएसपी, राष्ट्रीय चर्मकार संघटना, सिद्धार्थ मंडळ, सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समिती, नाग संघटना, संभाजी ब्रिगेड, एम.एच.२९-हेल्प लाईन, पंचशील संघटना, सत्यशोधक समाज, समता पर्व प्रतिष्ठान, ग्राहक संघटना, ब्ल्यू टायगर संघटना, रिपाई (खोब्रागडे), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, डॉ.आंबेडकर अभ्यासिका, शहर काँग्रेस सेवादल, सेवानिवृत्त वन संघटना, भीमशक्ती-शिवशक्ती संघटना, काँग्रेस, अल्पसंख्यक आघाडी, डॉ. आंबेडकर प्राध्यापक संघटना, प्रोटान- प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषद, आंबेडकर सेंटर फॉर जस्टीज अ‍ॅन्ड पीस, जन आधार कृती संघर्ष समिती, विदर्भ शेतकरी विकास परिषद, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, रिपाई (आठवले), लॉर्ड बुद्धा मैत्री संघ, अनुसूचित जाती विकास मंच, डेमॉक्रॉटिक एप्लाईमेंट सोशल असोसिएशन, राष्टÑील मूल निवासी महिला संघ, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, समता पर्व महिला बचत गट आदी पक्ष, संघटनांचा समावेश होता.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव