लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. या घटनेतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या समाजबांधवांवर कट रचून भ्याड हल्ला करण्यात आला. अनेक लोक जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला. या कटाचे मुख्य सूत्रधार भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी, मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी, विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, जीवित व शारीरिक हानी झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.निवेदन देताना अॅड. जयसिंह चव्हाण, अॅड. रवींद्र अलोणे, अॅड. धनंजय मानकर, अॅड. मिलिंद भगत, अॅड. नरेंद्र भगत आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव : विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:01 IST
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. या घटनेतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या समाजबांधवांवर कट रचून भ्याड हल्ला करण्यात आला. अनेक लोक जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला. ...
भीमा कोरेगाव : विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा
ठळक मुद्देलॉयर्स असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन