शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला शेतकरी, शेतमजूर व्यापाऱ्यांची नाराजी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:07 IST

पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : नरेंद्र मोदींची कार्यपद्धतीही ठरली जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धतीही तेवढीच कारणीभूत असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.किशोर तिवारी म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा राज्यांच्या विधानसभेच्या मंगळवारी लागलेल्या निवडणूक निकालावरून ग्रामीण भारतात शेतकरी, व्यापारी आणि विशेषत: कापूस उत्पादकांची भाजपावर नाराजी असल्याचे स्पष्ट झाले. या निमित्ताने ही नाराजी उघड झाली. ही भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चिंतनाची बाब आहे. भारत सरकारचा कृषी व ग्रामीण विकास कार्यक्रम, धोरणांच्या अंबलबजावणीतील प्रशासकीय कुचराई, कृषीमालाचे पडलेले भाव, अनियंत्रित लागवड खर्च, बँकांचा विस्कळीत पतपुरवठा, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमांना बँका व सनदी अधिकाऱ्यांकडून मिळणारे असहकार आदी बाबींचे मूळ भाजपाच्या पराभवात आहे. किमान आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन धोरण ठरवून उपाययोजना कराव्या, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मार्गी लावावे, अन्यथा पाच राज्यांच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा गर्भित इशाराही किशोर तिवारी यांनी दिला आहे.मोदींच्या दाभडीतील घोषणांचाही परिणामनरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. भाजपाची सत्ता येताच ‘अच्छे दिन’ येतील अशी हमी शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात साडेचार वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केले गेले नाही. त्याचाच परिणाम पाच राज्यातील निवडणुकांवर दिसून आला. शेतकऱ्यांनी भाजपाला स्पष्टपणे नाकारले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी नोंदविली. असेच चित्र आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातही पहायला मिळेल, असा विश्वास मोघे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक