शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
4
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
5
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
6
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
7
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
8
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
9
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
10
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
11
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
12
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
13
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
14
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
15
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
16
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
17
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
18
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
19
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
20
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By विशाल सोनटक्के | Published: April 08, 2023 4:29 PM

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेची वणी शहरामध्ये कारवाई

यवतमाळ : आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्याची रंगत सुरू झाली आहे. शुक्रवारी हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने हार-जीतचा सट्टा चालविला जात असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पथकाने वणी येथे धाड टाकून दोघाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून १ लाख ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

अफसर खान अनवर खान पठाण हा वणीतील शास्त्रीनगरमधील रहिवासी असून तो त्याच्या मालकीच्या आर.के. कोलडेपो वणी येथील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयपीएल सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह घटनास्थळी रवाना होवून छापा मारला.  यावेळी अफसर खान अनवर खान पठाणसह रिजवान सय्यद रियाज सय्यद (रा. मोमीनपुरा यवतमाळ) हे दोघे मोबाईल लॅपटॉपवरून सट्टा घेत असल्याचे आढळून आले.

पथकाने एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे यांच्यासह योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनिकांत मडावी आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीSatta Bazarसट्टा बाजारYavatmalयवतमाळ