शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

बेंबळा प्रकल्पाचे पाणी एप्रिलअखेर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:10 IST

शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमृत योजनेच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. बेंबळा प्रकल्पाचे पाणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यवतमाळकरांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमदन येरावार : टंचाई निवारणासाठी ‘अमृत’ची गती वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमृत योजनेच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. बेंबळा प्रकल्पाचे पाणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यवतमाळकरांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यवतमाळकरांपुढे बेंबळाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अमृत योजनेचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता या कामाला गती देण्यात आली आहे. अमृत योजना ही मोठी असून अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. ही योजना परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक कालावधी लागणार आहे. मात्र त्यातही यवतमाळातील टंचाईची दाहकता बघता कमीत कमी अवधीत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९७५ मध्ये निळोणा धरण साकारले होते. त्यानंतरही येथील पाणी समस्या कायमच होती. युती शासनाच्या काळात चापडोह धरण तयार करण्यात आले. तेव्हाच शहरातील ग्रामीण भागात सर्वदूर चापडोहचे पाणी पोहोचले. आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून सप्टेंबरपासूनच उपाययोजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली.अमृतची योजना एका टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. २३ एप्रिल २०१७ मध्ये हे कंत्राट देण्यात आले. २८ किलोमीटर पाईपलाईन, २० लाख लिटरचा सम्प, फिल्टर प्लांट, पंपींग हाऊस, ३३ केव्हीचे सब स्टेशन, पर्यायी व्यवस्था म्हणून चार मेगा वॅटचा सोलर प्लांट असा परिपूर्ण प्रकल्प केला जात आहे. २०१९ पर्यंत या प्रकल्पाचे काम करणे अपेक्षित असताना केवळ टंचाईसाठी तातडीची उपाययोजना म्हणून २८ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जात आहे. यापैकी १२ किलोमीटर अंतरापर्यंत एक हजार मिलीमीटरची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. उर्वरित काम सुरू आहे. नाशिकच्या अडके कंपनीकडे कंत्राट दिले आहे. गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी जीवन प्राधिकरणकडे आहे. अडकेंनी काही कामे स्थानिक कंत्राटदारांना दिली आहे. मात्र याची गुणवत्ता टिकविण्याची जबाबदारी अडके या कंपनीकडे आहे. ३०२ कोटीचं कंत्राट घेणारी कंपनी छोट्याशा चुकांमुळे अडचणीत येणार नाही. त्यामुळे गुणवत्तेबाबत निश्चिंत राहावे, असेही मदन येरावार यांनी सांगितले.अनेक वर्षानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत दुर्लक्षित होते. आता या जलस्त्रोतांकडे लक्ष केंद्रित केले असून पुरूज्जीवनाचे काम नगरपरिषद करत आहे. ७९ विहिरी साफ केल्या जात आहे. जनतेने या काळात दीड महिना सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा आहे. भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व काही सामाजिक संघटना यांच्याकडूनही मोफत टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी एकत्र येवून सहकार्याच्या भूमीकेने कामाची आवश्यकता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.शहरासाठी ८०० कोटींचा डीपीआरयवतमाळ शहरासाठी ८०० कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. दहा चौरस किलोमीटरचे शहर आता ८० चौरस किलोमीटरमध्ये विस्तारले आहे. अमृत योजनेतून ३०२ कोटींची पाणीपुरवठा योजना, भूमिगत वीजपुरवठा, रस्ते आणि १९७ कोटींची भूमिगत गटार योजना मंजूर झाली आहे. गटारी योजनेचे काम अनुभवी कंत्राटदार कंपनीलाच दिले जाणार आहे. यासाठी त्या कंपन्यांचा मागील ट्रॅक रेकॉर्ड तपासण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत गटारी योजनेचे काम वेळेतच पूर्ण होईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.आरोप करणे विरोधकांचे कामचयवतमाळच्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विधी मंडळात चर्चेला आला. यावर पालकमंत्र्यांनी म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळचा मुद्दा विरोधकांनी चर्चेला आणला. विरोधक म्हटल्यानंतर आरोप करणे त्यांचे काम आहे. विखे पाटलांनी नामोल्लेख केलेले दोषी आहेत की नाही हे कायदाच ठरवेल. त्यानंतर आम्ही काय करायचे ते पाहू. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून चांगलं काम करत आहे. याची पावती जिल्हा परिषदेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडूनच मिळत असल्याचे ना.मदन येरावार यांनी सांगितले.