शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:56 IST

वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देदारव्हा येथील समस्या : तक्रारींकडे वीज वितरणचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, याबाबत सजग नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.शहरातील रोहित्रावरील उघड्या पेट्या बंद करणे, फ्युजला ग्रीप लावणे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार नागरिकांनी निवेदन दिले. दारव्हा ते कारंजा रोडवरील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ रोहीत्र आहे. ते उघड्या अवस्थेत असल्याने जीवघेणे ठरत आहे. विविध नगरातील रोहित्रावरील पेट्या उघड्या असून वाटसरूंना मृत्यूचे निमंत्रण देत आहे. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रोहित्राजवळूनच ये-जा करतात. तसेच बँक आॅफ इंडिया, स्टेट बँकेकडे जाणारा मार्ग, तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस आदी भागात रोहीत्र असून ते उघडे आहे. या रोहित्राजवळच प्रवासी थांबा असल्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. नजर चुकीने रोहित्राच्या पेटीतील तारांना स्पर्श झाल्यास मृत्यूची दाट शक्यता आहे.रोहित्राच्या पेट्या बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. शिवाजी विद्यालयाजवळील पेटी तातडीने बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात वीज वितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे बिमोद मुधाने, डॉ.बी.के. पंडित, सोमेश्वर पंचबुद्धे, विजय दुधे, राजेंद्र दुधे, पंजाबराव गावंडे, अ‍ॅड.आर.एल. कठाणे, हेमांशू जाधव, योगेश राठोड, शंतनू देशकरी, मोहन गावंडे, गोपाल पवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.