शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:54 IST

येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाडा-तेलंगणातून हजारो भाविक दाखल : अतिरिक्त पोलीस तैनात, आगीच्या घटनेनंतर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

पुंडलिक पारटकर।लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी परिक्रमायात्रा आयोजित केली जाते. यासाठी राज्य व लगतच्या राज्यातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल होतात. या यात्रे दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची महत्वाची भूमिका असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची शक्यता गृहित धरून २० आॅगस्टला येथील पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी यू.डी. मादाडे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.परिक्रमायात्रेसाठी एसटीने ६५ अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या. पोलिसांनी १० अधिकारी व ९७ कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविली. ६५ बस माहूर बसस्थानक ते दत्त शिखरापर्यंत सेवा देणार आहे. परिक्रमायात्रा दत्तशिखर, कमंडलू तीर्थ, काळापाणी, अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागून सयामाय टेकडी, मातृतीर्थ, पांडव लेणी, देवदेवेश्वरी, वनदेव, कैलास टेकडी, शेख फरीदबाबा दर्गा, सर्व तीर्थ या मार्गे ४० किलोमीटरची परिक्रमा करणार आहे. प्रशासन तत्पर असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.धनोडा येथे वाहतूक ठप्पमहागाव/ धनोडा : परिक्रमा यात्रेसाठी हजारो यात्रेकरू माहूरकडे येत आहे. मात्र धनोडा येथून माहूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पैनगंगेच्या पुलावरील कठडे तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. माहूरकडे जाणारी एकेरी वाहतूक शनिवारी दुपारी ३ वाजतापासून ठप्प पडली. त्यामुळे धनोडा टी पॉर्इंटवर यवतमाळ, पुसद, महागावकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दहा वर्षात प्रथमच परिक्रमा यात्रेसाठी अलोट गर्दी झाली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन