शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले-आंबेडकर स्मृती पर्वाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:47 IST

महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.

ठळक मुद्देअशोक बसोत्रा यांचे मार्गदर्शन : ओबीसी हक्क आणि अधिकारापासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.‘भारतीय संविधान व सामाजिक वास्तव आणि फुले-आंबेडकरी विचारधारा’ या विषयावर अ‍ॅड. बसोत्रा यांनी विचार मांडले. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्या, शिष्यवृत्ती, पदोन्नती तसेच संसदेत ओबीसींना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतात समतामुलक समाजाची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी आपला हक्क व अधिकाराची लढाई आपल्याला स्वत: लढावी लागेल. ज्यांनी आपल्या वाट्याला समस्या निर्माण केल्या, तेच लोक आपली समस्या सोडवितील या भ्रमात ओबीसींनी राहू नये, असे ते म्हणाले.भारतीय संविधानात बाबासाहेबांनी ओबीसींसाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहे. मात्र आतापर्यंतचे कुठलेही सरकार ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. ओबीसीच्या मतांच्या भरवशावर सरकार बनले. मात्र त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळू दिले नाही. परिणामी आज ओबीसींची अवस्था दयनीय झाली आहे. हे वेळीच बदलले नाही तर परिस्थिती यापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही, असे अ‍ॅड. अशोक बसोत्रा यावेळी म्हणाले.यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पिसे, शासकीय मुद्रण व प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. दिलीप घावडे, राजेश देवके, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, माया गोबरे आदी उपस्थित होते. प्रारंभी सायली तिखे, शीतल फसाटे, नितीन वाघ, उषा खटे, गोपाल धोबे, सार्थक तिखे, प्रशांत उमरतकर, मीनाक्षी काळे, स्नेहल मदनकर, सायली वाघ आदींनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित गीते सादर केली. यशस्वीतेसाठी अशोक तिखे, डॉ. विजय कावलकर, प्रा. सविता हजारे, कल्पना मादेश्वर, कमल खंडारे, नीता दरणे, माधुरी फेंडर, काशीनाथ लाहोरे, संजय ढाकुलकर, दीपक वाघ, प्रफुल्ल खेडकर, दत्ता चांदुरे, रवींद्र घावडे, गंगाधर खंडारे, चंद्रशेखर तिखे आदींनी पुढाकार घेतला, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख संजय बोरकर यांनी दिली.