शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त प्रभार देण्यावरून घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:14 IST

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार देण्यावरून पदाधिकारी आणि अधिकाºयांत अंतर्गत धूसफूस सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदाधिकारी-अधिकाºयांत धुसफूस, वाद विकोपाला जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार देण्यावरून पदाधिकारी आणि अधिकाºयांत अंतर्गत धूसफूस सुरू आहे. हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता बळावली आहे.जिल्हा परिषदेत अ‍ॅडिशनल सीईओचे पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयाकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या समकक्ष दर्जाचा अधिकारी उपलब्ध असताना हा प्रभार कनिष्ठाकडे सोपविण्यात आल्याने पदाधिकारी संतप्त झाले आहे. त्यातच आता सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढील काही दिवस रजेवर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या विभागासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार देण्यावरून खलबते सुरू आहे.जिल्हा परिषदेत आधीच अनेक पदे रिक्त आहे. पंचायत विभाग प्रभारावर आहे. आता त्याच प्रभारी अधिकाºयाकडे अ‍ॅडिशनलचा चार्ज देण्याचा घाट प्रशासनातर्फे घातला जात आहे. वास्तविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद क्रमांक दोनचे आहे. या पदाच्या समकक्ष ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांचे पद आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प सचालकांकडे देणे अपेक्षित आहे. तथापि पारदर्शक प्रशासन हा प्रभार मर्जीतील विश्वासू अधिकाºयांना देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परिणामी अ‍ॅडिशनलच्या प्रभारावरून पदाधिकारी आणि अधिकाºयांत धूसफूस सुरू आहे.पदाधिकाऱ्यांनी लिहिले पत्रअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार सेवाज्येष्ठ असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे देण्यासाठी सर्व पदाधिकारी एकजूट झाले. त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय झाला. या पत्रावर सर्वांची स्वाक्षरी घेण्याची जबाबदारी एका पदाधिकाऱ्याने स्वीकारली. सदर पदाधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या राजकारणातील निष्णांत ‘पीए’ असल्याने ही जबाबदारी त्यांनी स्वीकारल्याचे सांगितले जाते. तथापि हे पत्र अद्याप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले किंवा नाही, त्यावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया झाल्या किंवा नाही, याबाबत गुप्तता पाळली जात आहे.