शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

बडदास्तीसाठी ‘आडजात’चा आधार

By admin | Updated: January 3, 2015 02:08 IST

परिपक्व सागवान वृक्षांबरोबरच आता आडजात कत्तलीचा सपाटा सुरू आहे. वनजमीन आणि मालकी खसाऱ्यातील आडजात कत्तल करून थेट विक्रीसाठी वखारी जात आहे.

यवतमाळ : परिपक्व सागवान वृक्षांबरोबरच आता आडजात कत्तलीचा सपाटा सुरू आहे. वनजमीन आणि मालकी खसाऱ्यातील आडजात कत्तल करून थेट विक्रीसाठी वखारी जात आहे. असे असताना केवळ वरिष्ठ वनाधिकारी आडजातच्या तस्करांकडून बडेजावसाठी मिळत असलेल्या रकमेपोटी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यासाठी वनसंरक्षणाची कामे सोडून चक्क वनमजुरांनाच नेमण्यात आल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण यवतमाळ वनवृत्तातच मौल्यवान सागवान वृक्षांबरोबर आडजातीची वृक्षही मोठ्या प्रमाणात आढळतात. इंधन आणि फर्नीचरसाठी आडजात लाकडाची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. नेमकी हीच बाब हेरून आता काही तस्करांनी सागवान वृक्षांबरोबरच आडजात वृक्षांचीही कत्तल करण्याचा सपाटा चालविला आहे. मालकी खसारा (शेती) मध्ये असलेले आडजात वृक्ष शेतकरी विकतात. हे वृक्ष खरेदी करून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची वृक्षतोड परवानगी आणि वनविभागाची वाहतूक पास अशी कुठलीच प्रक्रिया लाकूड व्यावसायिक करीत नाहीत. थेट झाडे तोडून त्यांचे लाकूड आरामशीन आणि वखारीत नेल्या जाते. यवतमाळ वनवृत्तातील सर्वच उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत हा गंभीर प्रकार सर्रास सुरू आहे. आडजात ठेकेदारांना वृक्षांची तोड, वाहतूक आणि विक्री बिनबोभाटपणे करून देण्याचा जणू वनाधिकाऱ्यांनी अलिखित करारच करून दिला आहे. त्यासाठी ठेकेदार महिन्याकाठी ठरलेली रक्कम मोजतात. या रकमेतून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बडदास्त केली जाते. या आर्थिक वसूलीची जबाबदारी काही वनमजुरांकडे सोपविण्यात आली आहे. वसूलीत माहिर वनमजुरांना वनसंरक्षणाचे कुठलेही काम देण्यात येत नाही. केवळ वसूली करायची आणि शासनाचा पगार घ्यायचा एवढीच त्यांची जबाबदारी आहे. एवढेच नव्हे तर वनाधिकाऱ्यांच्या ओल्या पार्ट्यांमध्ये सरबराई आणि त्यांची दैनंदिन कामेही या वनमजुरांकडूनच करवून घेतली जात असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)