शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

आयुष्याच्या सायंकाळी निराधार जनाबाईला मंदिराचा आधार

By admin | Updated: January 3, 2015 02:10 IST

वय वर्ष ७०. मागे पुढे कुणीच नाही. रहायला घरही नाही. शासनाच्या निराधाराचे पैसेही वेळेवर येत नाही. अशा स्थितीत आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

उत्तम चिंचोळकर गुंज वय वर्ष ७०. मागे पुढे कुणीच नाही. रहायला घरही नाही. शासनाच्या निराधाराचे पैसेही वेळेवर येत नाही. अशा स्थितीत आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा संघर्ष सुरू आहे. दिवस कुठे तरी काढायचा आणि रात्री विठ्ठलाच्या मंदिरात पथारी पसरायची, असा तिचा दिनक्रम. वर्षभरापासून निराधारचे मानधनच आले नाही. त्यामुळे गुंजच्या जनाबाई अडकिने या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथे जनाबाई अडकिने ही वृद्धा राहते. तिला जवळचे कुणीही नातेवाईक नाही. घर ना शेत अशी तिची अवस्था आहे. मोलमजुरी करून ती जगत होती. मात्र आता शरीर साथ देत नाही. कोणतेही काम होत नाही. अशा स्थितीत तिला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार मिळाला. त्यातून आपला उदरनिर्वाह करू लागली. मात्र गेल्या वर्षभरापासून जनाबाईला मानधनच आले नाही. त्यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली. निराधार योजनेचे पैसे आले का हो, असे म्हणत, तहसील आणि बँकांचे उंबरठे झिजविते. मात्र कुणीही तिला दाद देत नाही. पैसेच नसल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळचे जेवणही राहायला घर नसल्याने ती रात्री गावातील विठ्ठल मंदिराचा आश्रय घेते. महागाव तालुक्यात जनाबाईसारख्या अनेक वृद्ध महिला आहे. ज्यांचा उदरनिर्वाहच केवळ निराधार योजनेच्या मानधनावर होतो. परंतु शासनाच्या लालफितीत अडकलेले प्रशासन त्यांना मदतीपासून दूर ठेवते. विशेष म्हणजे महागाव तालुक्यात निराधारांसाठी मोठे आंदोलनही छेडण्यात आले होते. मोर्चा काढून आपला रोषही या निराधारांनी व्यक्त केला होता. परंतु अद्यापही अनेक गरजवंतांना निराधारचे मानधन मिळाले नाही. जनाबाईही त्यातील एक. दररोज ती मोठ्या आशेने आज तरी पैसे येईल आणि उधार घेतलेले लोकांचे पैसे देता येईल, अशी प्रतीक्षा करीत असते.