शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पुसद शहरातील बरखा टॉकीजला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:23 IST

येथील बरखा टॉकीजला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. सिनेमागृहाच्या आत बसून मनोरंजक चित्रपट पाहणाऱ्या पुसदकरांना संपूर्ण जळते सिनेमागृह पाहणारे प्रेक्षक बनावे लागले.

ठळक मुद्दे२५ लाखांचे नुकसान : रात्रीचा ‘शो’ संपल्यावरचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील बरखा टॉकीजला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. सिनेमागृहाच्या आत बसून मनोरंजक चित्रपट पाहणाऱ्या पुसदकरांना संपूर्ण जळते सिनेमागृह पाहणारे प्रेक्षक बनावे लागले.शहराच्या मध्यभागी बरखा टॉकीज आहे. गुरूवारी रात्री शेवटचा ९ ते १२ चा शो संपल्यानंतर प्रेक्षक घरी परतले होते. काही वेळाने टॉकीजमधून धूर येताना दिसला. चौकीदाराने याबाबत मालक कबीरोद्दीन गाझीयानी यांना माहिती दिली. ही वार्ता शहरातही पसरली. लगेच पुसद, उमरखेड व दिग्रस येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ४ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीत संपूर्ण टॉकीज खाक झाली. यात सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लुले यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली व गर्दीला नियंत्रित केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा कयास वर्तविला जात आहे. टॉकीज मालक कबीरोद्दीन गाझीयानी, मॅनेजर बदरुद्दीन गाझीयानी यांनी शहर पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे.

टॅग्स :fireआग