शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

ढाणकीकरांसाठी बँकेच्या योजना मृगजळच

By admin | Updated: February 12, 2016 03:04 IST

बँकेच्या विविध आकर्षक योजनांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून येतात. प्रत्यक्षात ढाणकीकरांना मात्र अनेक

ग्राहकांना मनस्ताप : कर्जासाठी उंबरठे झिजवून थकले नागरिकढाणकी : बँकेच्या विविध आकर्षक योजनांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून येतात. प्रत्यक्षात ढाणकीकरांना मात्र अनेक अग्नीदिव्य पार करूनही या योजनांचा लाभ मिळत नसल्याने ढाणकीकरांसाठी बँकेच्या योजना म्हणजे निव्वळ मृगजळ ठरत आहेत.बँकेतर्फे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय-उद्योगासाठी कर्ज, कॅश क्रेडीट, सुवर्ण तारण कर्ज, अशा विविध कर्ज योजना राबविल्या जातात. घर हे तर प्रत्येकाचे एक स्वप्न असते. बांधकामाच्या साहित्याच्या वाढत्या किंमती पाहता कर्जाशिवाय घर बांधणे हे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरचे असते त्यामुळे बँकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी लोक बँकेकडे येतात. गृहकर्जासाठी बँकेच्या चकरा मारुन कर्ज मागणाऱ्यांच्या चपला व बँकेचे उंबरठे दोनही झिजतात परंतु कर्ज काही मिळत नाही हा येथील बहुतांश व्यापारी व कर्मचारी यांचा अनुभव आहे.वैयक्तिक कर्जाचाही हाच अनुभव ग्राहकांना येत आहे. कामाचा खूप व्याप आहे. या सबबीखाली शाखा व्यवस्थापक ग्राहकांना पुन्हा पाहू असे म्हणून टोलवाटोलवी करतात. काही धनदांडग्यांना मात्र सर्व योजनांचा लाभ दिला जातो. कॅश क्रेडीट, मुद्रा सारख्या योजनांचा लाभ ‘तोंड पाहून’ देण्यात आल्याचा आरोपही होत आहे. लोन केस करण्यासाठी विमा काढण्याचा आग्रह धरला जातो. विम्याचे प्रिमीयम अगोदरच घेतले जाते आणि मग पुन्हा कर्जासाठी कर्जदारांना फिरवले जाते. परंतु कर्जदाराला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.असा अनुभव येथील स्टेट बँकेच्या शाखेत अनेकांनी घेतला आहे. परंतु स्थानिक व्यवस्थापनामुळे बँकेच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र या प्रकाराकडे लक्ष द्यायला वरिष्ठांनाही वेळ दिसत नाही. (वार्ताहर)